सिंधुदुर्गनगरीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

By admin | Published: June 21, 2017 04:22 PM2017-06-21T16:22:12+5:302017-06-21T16:22:12+5:30

परिसरातील योगप्रेमींनी घेतला लाभ

International Yoga Day celebrated in Sindhudurg | सिंधुदुर्गनगरीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

सिंधुदुर्गनगरीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Next



आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. २१ : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जून २0१७ रोजी ओरोस येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले.


या वेळी कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले-देशमुख, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, नेहरु युवा केंद्राच्या अपेक्षा मांजरेकर हे उपस्थित होते.
या वेळी सिंधुदुर्गातील नामांकित योग प्रशिक्षक वैद्य सुविनय दामले व साधना गुरव यांनी प्रात्याक्षिक व मार्गदर्शन केले. या वेळी नेहरु युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक, नर्सिंग स्कुल ओरोस, जिल्हा पोलिस मुख्यालय, डॉन बॉस्को स्कुल ओरोस, न्यू इंग्लिश स्कुल ओरोस येथील सर्व योगप्रेमीनी या शिबीराचा लाभ घेतला.


निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी उपस्थित योगप्रेमीना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी योगाचे महत्व विषद केले.
यावेळी ते म्हणाले की, योगसाधनेला आपल्या भारतात अनन्य साधारण महत्त्व आहे. योगाची उत्पत्ती ही आपल्या भारतामधूनच झाली. योग हा आजच्या दिवसापुरताच नसून तो संपूर्ण जीवनासाठीआहे. एम. पी.एस. सी. व यू. पी. एस. सी. चे प्रशिक्षक प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी ते योगा करुनच जातात. योगामुळे माणूस दिघार्युषी होतो.


सुत्रसंचालन आयुष अधिकारी कृपा तारी यांनी केले आभार जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी मानले.

Web Title: International Yoga Day celebrated in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.