रेकॉर्ड डान्समध्ये ईशा गोडकर, अनिकेत आसोलकर प्रथम
By Admin | Published: May 24, 2015 10:37 PM2015-05-24T22:37:17+5:302015-05-25T00:31:44+5:30
राज्यस्तरीय स्पर्धा : मसुरे डांगमोडे येथील इस्वटी महापुरूष भजन मंडळाचे आयोजन
बागायत : मसुरे डांगमोडे येथील इस्वटी महापुरुष भजन मंडळाच्यावतीने खुल्या राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत छोट्या गटात ईशा गोडकर (शिरोडा), तर मोठ्या गटातून अनिकेत आसोलकर (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेतील छोट्या गटातून दुसरा ते नववा क्रमांक मिळविलेल्यांमध्ये अनुक्रमे : अपूर्वा बांदेकर (मालवण), प्रार्थना मातोंडकर (सावंतवाडी), नम्रता परुळेकर (कणकवली), स्टेला डान्टस (सावंतवाडी), मिताली धारगळकर (मसुरे), जॉय डान्टस (सावंतवाडी), अनुष्का सावंत (कुडाळ), भूमी म्हापसेकर (सावंतवाडी) यांचा समावेश आहे, तर मोठ्या गटातून द्वितीय मृणाल सावंत (कुडाळ), तृतीय श्वेता चव्हाण (मालवण), चतुर्थ नेहा जाधव (इन्सुली), हर्षदा मेस्त्री (मालवण), सायली राऊळ (कुडाळ), अंजुषा बांदेकर (मालवण), अलिशा नांदोसकर (मालवण), नम्रता कामतेकर (देवगड) यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण रेश्मा पेडणेकर यांनी केले.मोठ्या गटातील पहिल्या चार क्रमांकांना अनुक्रमे रुपये ३ हजार, १५००, १ हजार व ७०० व पाच ते आठ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये, छोट्या गटातील पहिल्या चार क्रमांकांना अनुक्रमे रुपये २ हजार, १ हजार, ७०० व ५०० तर पाच ते नऊ क्रमांकाना प्रत्येकी रुपये ३०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, सरपंच गायत्री ठाकूर, वीज वितरण अधिकारी बोटलवार, मातोंड उपसरपंच जितेंद्र परब, मसुरे पोलीस ओमासे, प्रकाश ठाकूर, मंगेश आंगणे, समीर ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, कोमल शिंगरे, सायली कातवणकर, वनिता कुंजरकर, अर्जुन ठाकूर, दत्तप्रसाद पेडणेकर, झुंजार पेडणेकर, अरुण ठाकूर, स्वप्नील ठाकूर, व्यंकटेश ठाकूर, कमलेश ठाकूर, रतन ठाकूर, अनिल ठाकूर, संतोष ठाकूर, अनंत भोगले आदी ईस्वटी महापुरुष भजन मंडळ व नवतरुण मित्रमंडळ डांगमोडेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश आंगणे यांनी, तर बाळप्रकाश ठाकूर यांनी आभार मानले. (वार्ताहर)