इस्त्राईल पर्यटकांची देवगडात तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 06:10 PM2020-03-17T18:10:45+5:302020-03-17T18:16:54+5:30
रविवारी देवगड बीच येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या तीन इस्त्राईल पर्यटकांचीही आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली.
देवगड : विदेशात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही प्रवेश केला असून विदेशी पर्यटक व विदेशातून आलेले भारतीय नागरिक यांची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी देवगड बीच येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या तीन इस्त्राईल पर्यटकांचीही आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली.
देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, एस. पी. कांबळे, शैलेंद्र कांबळे, एफ. जी. आगा व महसूल विभागाचे कर्मचारी तसेच त्यांच्यासमवेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत व कर्मचारी यांनी देवगड बीच येथे जात इस्त्राईलहून देवगडात आलेल्या तिन्ही पर्यटकांची तपासणी केली. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, असे डॉ. भगत यांनी सांगितले.