रक्तदानातून समाजकार्याचा वसा जपत आहात हे कौतुकास्पद : अमित सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:19 PM2020-12-15T19:19:31+5:302020-12-15T19:21:16+5:30

Blood Bank, Kankavli, Sindhudurngnews समाजकार्याचा वसा आपण सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपत आहात, हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.

It is admirable that you are saving the fat of social work through blood donation: Amit Samant | रक्तदानातून समाजकार्याचा वसा जपत आहात हे कौतुकास्पद : अमित सामंत

फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथे आयोजित रक्तदान शिबिराचा प्रारंभ जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमित सामंत, अनंत पिळणकर, राजेंद्र पावसकर , रुपेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देरक्तदानातून समाजकार्याचा वसा जपत आहात हे कौतुकास्पद : अमित सामंत नविनकुर्ली वसाहत येथे रक्तदान शिबिर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज नंदुरबार जिल्ह्याशी रक्ताचे नाते जोडले आहे. आमच्या जिल्ह्यातील रक्त आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चालले आहे. याचा मला अभिमान वाटत आहे. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला समाजकार्याचा वसा आपण सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जपत आहात, हे कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकारातून कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मारुती निवास, नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट या ठिकाणी मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेस्त्री, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नजीरभाई शेख, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधानगरी तालुकाध्यक्ष किसन चौगुले, कणकवलीचे पक्ष निरीक्षक सावळाराम अणावकर, सुंदर पारकर, डॉ .अभिनंदन मालंडकर, मंगेश दळवी, सागर वारंग, निसार शेख, संदेश मयेकर, विष्णु पिळणकर आदी उपस्थित होते.

सतीश सावंत म्हणाले , शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानातून कोकणातही कृषी क्रांती घडली आहे. आज त्यांच्या प्रेरणेतून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेले रक्तदान शिबीर निश्चितच राज्यातील गरजू लोकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.

डॉ. श्रीमंत चव्हाण म्हणाले, कोरोना आणि रक्त माणसाला माणुसकी शिकवतात, ते भेदभाव करत नाहीत. जातीयता ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. रक्त हे माणसाला जीवन देते. त्याचे कारखाने कुठेच नाहीत. त्यामुळे रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे.

अनंत पिळणकर म्हणाले, या पुढच्या काळात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राजकारणाबरोबरच समाजकारण करत राहणार आहे. कार्यकर्त्यांनी अशीच साथ कायम द्यावी. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 

Web Title: It is admirable that you are saving the fat of social work through blood donation: Amit Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.