कणकवली भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:03 PM2020-12-24T20:03:57+5:302020-12-24T20:06:18+5:30

Kankavli Sindhudurg- कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात चुकीची कामे केली जात आहेत. हरकुळ खुर्द येथील नंदकिशोर कुलकर्णी यांच्या जमिनीची चुकीची मोजणी करीत हद्द दाखविली. त्यामुळे कुलकर्णी यांच्या मालकीची १५० कलमे तोडण्यात आली. त्याला जबाबदार कोण? मोजणी, कमी-जास्त पत्रक व अन्य कामे रखडवून नागरिकांना त्रास का दिला जातो ? असा जाब परशुराम उपरकर यांनी उपअधीक्षक प्रकाश भिसे यांना विचारत मंगळवारी धारेवर धरले.

Jab asked the Kankavali land records officer | कणकवली भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना विचारला जाब

कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांशी परशुराम उपरकर यांनी विविध विषयांबाबत चर्चा केली.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना विचारला जाब परशुराम उपरकर यांनी केली चर्चा : उपसंचालकांसमोर मांडणार समस्या

कणकवली : कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात चुकीची कामे केली जात आहेत. हरकुळ खुर्द येथील नंदकिशोर कुलकर्णी यांच्या जमिनीची चुकीची मोजणी करीत हद्द दाखविली. त्यामुळे कुलकर्णी यांच्या मालकीची १५० कलमे तोडण्यात आली. त्याला जबाबदार कोण? मोजणी, कमी-जास्त पत्रक व अन्य कामे रखडवून नागरिकांना त्रास का दिला जातो ? असा जाब परशुराम उपरकर यांनी उपअधीक्षक प्रकाश भिसे यांना विचारत मंगळवारी धारेवर धरले. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक यांना कणकवलीत बोलावून या कारभाराबाबत लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत शिष्टमंडळासह मंगळवारी धडक दिली. यावेळी शेतकरी नंदकिशोर कुलकर्णी, संतोष सावंत, बाळकृष्ण कुलकर्णी, कोरगावकर यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात सावळागोंधळ सुरू आहे. अनेकांची कामे रखडून ठेवण्यात आलेली आहेत. कमी-जास्त पत्रक मोजणी व अन्य पक्षकारांना नाहक त्रास दिला जात आहे. एका प्रकरणात दिवाणी न्यायालयाचा आदेश असूनदेखील वाटपपत्र करण्यास टाळाटाळ केली जात आहे. हा न्यायालयाचा अवमान आहे. हे वाटपपत्र केव्हा होणार? यासह असंख्य प्रश्नांचा भडिमार नागरिक व मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रकाश भिसे यांच्यावर केला.

तक्रारदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

परशुराम उपरकर यांनी कणकवली भूमी अभिलेख कार्यालयासंदर्भात लवकरच नागरिकांच्या तक्रारी घेऊन उपसंचालक यांना कणकवलीत बोलावणार आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील नागरिक आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी कणकवली येथील मनसे कार्यालयात द्याव्यात. त्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात करण्यात येतील, असे सांगितले.
 

Web Title: Jab asked the Kankavali land records officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.