Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:07 PM2024-09-14T17:07:20+5:302024-09-14T17:07:44+5:30

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे ...

Jaideep Apte, who has been booked in the case of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj falling down, has been sent to judicial custody till September 24 | Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या चेतन पाटील याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी आपले म्हणणे सादर न केल्याने ही सुनावणी आता १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा पोलिस बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यादरम्यान त्याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी म्हणणे न दिल्याने ही सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Jaideep Apte, who has been booked in the case of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj falling down, has been sent to judicial custody till September 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.