जालन्यातील लाठी हल्ल्याचा निषेध: कणकवलीत शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

By सुधीर राणे | Published: September 4, 2023 12:35 PM2023-09-04T12:35:58+5:302023-09-04T12:37:16+5:30

कणकवली : मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज ...

Jalana Lathi Attack Protest: Maratha community members took to the streets In Kankavli | जालन्यातील लाठी हल्ल्याचा निषेध: कणकवलीत शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

जालन्यातील लाठी हल्ल्याचा निषेध: कणकवलीत शेकडो मराठा समाज बांधव उतरले रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

कणकवली: मराठा समाजावर झालेल्या जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी कणकवलीत मराठा समाज बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणकवली पटवर्धन चौक मार्गे मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चात आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पडते, ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते संदेश पारकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता.  

मोर्चामध्ये भगव्या टोप्या व 'एक मराठा लाख मराठा' च्या टोप्या परिधान केलेले मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी 'या लाठी सरकारचे करायचं काय?, खाली डोकं वर पाय', 'लाठी चार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो', आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा गावडे, सुशांत दळवी, समीर परब, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, माधवी दळवी, संतोष परब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: Jalana Lathi Attack Protest: Maratha community members took to the streets In Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.