जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 2, 2023 01:40 PM2023-09-02T13:40:12+5:302023-09-02T13:41:21+5:30

दगड मारणारे कोण?

Jalna lathicharge case: Conspiracy to defame Maratha community, MLA Nitesh Rane makes serious allegations | जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

जालना लाठीचार्ज प्रकरण: मराठा समाजाला बदनाम करण्याचा कट, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

googlenewsNext

कणकवली : मराठा समाज आंदोलनावर झालेल्या लाठी चार्ज चे समर्थन केले जाणार नाही. कोणी अधिकाऱ्याने  मस्ती केली आले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार सोडणार नाही. जालना येथील शिवबा संघटनेचे पाटील हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जेव्हा चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल केल्या होत्या तेव्हा माजी खासदार निलेश राणे यांनी सहकार्य करून वाचवले होते. 

पाटील यांचे शांत पद्धतीने आंदोलन चालू होते प्रशासन आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा दगड कोणी मारले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे खास कार्यकर्ते रघुनाथ शिंदे यांचा सहभाग, दगडफेक आणि एसटी बस जाळपोळ प्रकरणी दिसून आला आहे. याचा अर्थ दंगल घडणार अशी आधी भाकिते करायची आणि नंतर त्यांच्याच लोकांनी जाळपोळ करायची. हा एक प्रकारचा नियोजित कट आहे. मराठा बांधवांनी या चुकीच्या लोकांच्या आवाहनाला बळी पडू नये, कायदा हातात घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार आहे. कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

दगड मारणारे कोण?

कणकवली ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात घुसून दगडफेक केली गेल्याचा आरोप केला. ते म्हणले मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले कोणाला त्रास दिला नाही. मग पोलिसांवर दगड मराठा समाज बांधव मारणार नाही. आमचा समाज शांत आणि संयमी आहे. त्याने मोर्चातून ते दाखवून दिले. तेव्हा दगड मारणार नाही. मात्र ते दगड मारणारे कोण होते हे शोधले जातील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री, गृहमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे योग्य ती माहिती समोर येईल.

मराठा समाजाला ठाकरे सेनेने बदनाम केले

मराठा समाजाला आता आणि तेव्हा सुद्धा ठाकरे सेनेने बदनाम केले. मराठा आरक्षणावर बाजू  कोर्टात मांडली नाही आणि या केसची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आताच्या विरोधकांनी केले होते. अशा लोकांनी मराठा आरक्षणावर बोलूनच नये. संजय राऊत आणि त्याचे नेते काय म्हणून टीका करतात. राऊत ने मुका मोर्चाचे कार्टून पेपरमध्ये छापून मराठा आरक्षण मोर्चाची  बदनामी केली. तर विजय वड्डटीवार  हे मंत्री असताना मराठा आणि इतर समाज यांच्यात वाद करण्याचा प्रयत्न केला. दंगली पेटवल्या कोणी, कोणाला हव्या आहेत. दंगल दंगल कोण बोलत होता. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या जाळल्या तो शिंदे हा दानवे यांचा कार्यकर्ता आहे.

सरकार आपले, अन्याय होणार नाही 

आता सरकार तुमचेच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत त्यामुळे हे सरकार आपले आहे अन्याय होणार नाही याची खात्री देतो. संभाजी महाराज यांनी दगड कोणी मारले याची चौकशी करावी. समाजाची बदनामी होते. शरद पवार यांनी सुद्धा भेटीत दगड मारणारे हात कोणाचे आहेत हे पाहावे असेही राणे म्हणाले. दरम्यान मी स्वतः जालना येथे जावून आंदोलनाला भेट देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Jalna lathicharge case: Conspiracy to defame Maratha community, MLA Nitesh Rane makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.