‘जलशिवार’ने तहान भागणार

By admin | Published: November 11, 2015 09:32 PM2015-11-11T21:32:07+5:302015-11-11T23:47:42+5:30

रत्नागिरी जिल्हा : ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली...!

'Jalshivar' will suffer thirst | ‘जलशिवार’ने तहान भागणार

‘जलशिवार’ने तहान भागणार

Next

रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्याला पाचप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ४७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीसाठ्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर इतकी वाढ झाली आहे. संरक्षित सिंचनामुळे ५८६.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असून, ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे.
यावर्षी निम्मा पाऊस झाल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईचा धोका आहे. कोकणातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाले, समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे पाणी अडवण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सध्या शासनाकडून लोकसहभागातून बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि विजय बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था बंधारे उभारण्याच्या कामात सहभाग होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २०७० बंधारे उभारण्यात आले आहेत. लोकसहभागातून भविष्यात १० हजार बंधारे उभारण्याचे काम पूर्ण करून करोडो लीटर पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चत करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५६४.९९ हेक्टर क्षेत्रावर समतल चर मारल्यामुळे ४८५.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. १६ हेक्टर क्षेत्रावर मजगी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे १५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ४३.१२ दशलक्ष घनमीटर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आहे. ३० शेततळी उभारण्यात आली आहेत. एका शेततळ्यात २.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होतो. त्यामुळे शेततळ्यांव्दारे १३१.७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ३९.९६ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्यात ३५ नालाबांध बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ५६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. १३०.६० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. २० माती नाला बांध बांधण्यात आले असून, २४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ७६.४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यात १५४०.५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून, पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. ३९१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार असल्यामुळे दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)



श्रमदानातून बंधारे : ग्रामस्थांचा सहभाग
1राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना जाहीर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ग्रामस्थ श्रमदानाने बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या कामी पुढे येताना दिसत आहेत.
2दापोली, गुहागर या तालुक्यात या बंधाऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून, त्याठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कृतीतून इतर गावांनाही प्रेरणा मिळू लागली आहे.
3यंदा पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई जाणवणार हे निश्चित आहे. प्रतिवर्षी पाणीटंचाईवर करोडो रुपयांचा खर्च होतो. यावर्षी तर तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Jalshivar' will suffer thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.