जान्हवी सावंत : वेंगुर्ले तालुका शिवसेना कार्यालयास भेट
By admin | Published: March 4, 2016 09:52 PM2016-03-04T21:52:32+5:302016-03-05T00:10:36+5:30
शहरातील रिक्त पदे भरताना कार्यकर्त्यांचे समाजातील समाजकार्य पाहूनच पदाधिकारी निवडले जातील
वेंगुर्ले : सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून शिवसेना पक्ष मजबूत बनवूया. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपली सत्ता येईल यासाठी जोमाने विकासाची कामे करूया, वेंगुर्ले तालुक्यातील व शहरातील रिक्त असलेली महिला शिवसेनेची पदे लवकरच भरली जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी येथे दिले.शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी गुरुवारी वेंगुर्ले तालुका शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तालुक्यातील व शहरातील रिक्त पदे भरताना कार्यकर्त्यांचे समाजातील समाजकार्य पाहूनच पदाधिकारी निवडले जातील, असे सावंत यांनी सांगितले. दरम्यान, पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर व उपजिल्हाप्रमुख हुले यांच्या हस्ते जान्हवी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख अर्चना हडकर, शहरप्रमुख निशा नाईक, जिल्हा परिषदेचे सदस्य सुकन्या नरसुले, योगिता परब, आडेली विभागप्रमुख मोना नाईक, वार्डप्रमुख वृंदा मोर्डेकर, मंजुषा आरोलकर, शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, युवा तालुकाप्रमुख डेलीन डिसोजा, नितीश कुडतरकर, डॉ. जगन्नाथ सावंत, गजानन गोलतकर, नाना वालावलकर, कार्यालय प्रमुख बाळा नाईक यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)