वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणा-या जयंत बरेगारांचे उपोषण मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 02:10 PM2018-07-01T14:10:32+5:302018-07-01T14:10:39+5:30
सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी व दोडामार्गमधील २५ गावात बंदी असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे. या विरोधात वनविभागाने कठोर कारवाई करावी तसेच या विरोधात वनविभागाने न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी येथील सावंतवाडी वनविभागाच्या मुख्य कार्यालयासमोर शनिवारी सकाळ पासून उपोषण सुरू केले होते ते रात्री उशिरा मागे घेतले.यात जिल्हाधिकारी याच्या सोबत बैठक घेउन योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन उपवनसंरक्षक चव्हाण यानी दिले तसेच बरेगार याच्याकडून आठवड्याची मुदत घेतले आहे तर बरेगार यानी वनविभागाने अवमान याचिका दाखल करावी अन्यथा वनविभागा विरोधात न्यायालयात जाईन असा इशारा दिला आहे.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यातील २५ गावांमध्ये बंदी क्षेत्र आहे. असे असतानाही या बंदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. मात्र येथील वनविभागाने न्यायालयाची दिशाभूल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीचा अहवाल मागितला तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितली, पण कोणतीही पाहाणी करण्यात आली नाही.
येथील उपवनसंरक्षक सतत चुकीची माहिती देऊन लोकांची तसेच न्यायालयाची दिशाभूल करीत आहेत. या विरोधात सतत आवाज उठवला, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच आज हे उपोषण करीत आहे, असे जयंत बरेगार यांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी सकाळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी भेट दिली. मात्र बरेगार यांनी केलेली मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. तसेच हा विषय जिल्हाधिकारी यांच्या अख्यत्यारीत येत आहे, असे सांगितले.
बरेगार यांनी उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अवमान याचिका केव्हा करणार हे आम्हाला लेखी द्या, अशी मागणी केली. पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण हे ओरोस येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या बैठकीसाठी गेले होते ते रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले त्यानंतर चव्हाण यानी बरेगार याच्याशी सविस्तर चर्चा केली यात अवमान याचिकेचा विषय हा जिल्हाधिकारी याच्या संर्दभा येतो त्यामुळे तेथे बैठक घेउन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेउ असे सागत उपोषण करण्या बाबत विनती केली तसे लेखी पत्र ही बरेगार याना उपवनसंरक्षक यानी दिले त्यानंत बरेगार यानी आपले उपोषण मागे घेतले यावेळी कुडाळ व सावंतवाडी वनक्षेत्रपाल तसेच वन कर्मचारी उपस्थीत होते.
लेखापालना लवकरच कार्यमुक्त करणार!
बैठकस्थळी जयंत बरेगार यांनी लेखापाल संजय आंबेराय यांची बदली झाली, मग एक महिना त्यांना येथे का ठेवले, असा सवाल केला. त्यावर आपण त्यांना लवकरच सोडणार आहे, असे सांगितले. तसेच या मागण्या मान्य करा, मला लेखी द्या, मग मी माझे उपोषण मागे घेतो, असेही बरेगार यांनी चर्चेवेळी चव्हाण यांना सुनावले.