Jayant Patil "आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:34 PM2024-08-28T13:34:12+5:302024-08-28T13:39:15+5:30

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अपघात प्रकरणी आज महाविकास आघाडीने घटनास्थळी भेट दिली.

Jayant Patil's mediation attempt at Malvan Fort Rane - Thackeray supporters will back down | Jayant Patil "आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

Jayant Patil "आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अपघात प्रकरणी आज महाविकास आघाडीने घटनास्थळी भेट दिली. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांसह उपस्थित आहेत. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने ताणावाचे वातावरण तयार झाले आहे. दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, आता या प्रकरणात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही गटात मध्यस्ती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने 

मालवण येथील किल्ल्यावर ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आले आहेत. दोन्ही गट मागे हटायला तयार नाही, यामुळे आता जयंत पाटील यांनी मध्यस्तीचे प्रयत्न सुरू केले असून दोन्ही बाजूच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. 

जंयत पाटील यांनी स्वत: नारायण राणे आणि नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. राणे समर्थकांना यावेळी पाटील यांना आधी त्यांना समजवा असं सांगितल्याचे दिसत आहे.

पोलिसांचा ताफा वाढवला

मालवण किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये गोंधळ वाढला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. 

जयंत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी ठाकरे गट आणि राणे समर्थकामध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिली. जयंत पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे राज्यातील लोक इकडे येणार. किती अतिरेक करावा हे स्थानिकांनी ठरवावं. आता एक ग्रुप पुतळा बघून बाहेर जात होता. आम्ही आत ऑलरेडी गेलो होतो. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची झाली, असंही पाटील म्हणाले. 
 

Web Title: Jayant Patil's mediation attempt at Malvan Fort Rane - Thackeray supporters will back down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.