जयराज मालवणकर अद्याप मोकाटच

By admin | Published: May 12, 2015 09:31 PM2015-05-12T21:31:46+5:302015-05-13T00:56:38+5:30

पोलीस तपास निष्क्रिय : दोन वर्षे पोलीस यंत्रणेला देतोय गुंगारा

Jayaraj Malwankar still scolded | जयराज मालवणकर अद्याप मोकाटच

जयराज मालवणकर अद्याप मोकाटच

Next

श्रीकांत चाळके - खेड -कोकण रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी तब्बल लाख रूपये मोजणाऱ्यांची आता दयनीय अवस्था झाली आहे. खेड तालुक्यातील १५ तरूण बेरोजगार आणि त्यांचे पालक जयराज मालवणकर या भामट्याला बळी पडले आहेत. दोन वर्षे उलटली तरीही पोलिसांना याकामी यश आले नाही. मालवणकर हा अद्याप मोकाट आहे. त्याला पोलीस का अटक करू शकत नाहीत, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे़ .
मूळचा सिंधुदुर्गचा रहिवासी असलेला जयराज मालवणकर भरणे - गौळवाडी येथे गेल्या पाच वर्षांपासून राहात होता. काही दिवस खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करता करता त्याची अनेकांशी ओळख झाली. त्याचा फायदा त्याने अनेकदा उठवला. अशातच २०११मध्ये आंबवली, विहाळी, किंजळे, चकदेव आणि दयाळ येथील १५ लोकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून रक्कम हडप केली आहे. कोकण रेल्वेसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी २५ हजार ते २ लाख रूपयांना मालवणकरने फसवले. याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, त्याला अद्याप यश आले नाही. विशेष म्हणजे मालवणकरची बँक खाती असलेल्या आयसीआयसीआय बँकेत २०१३ मध्ये केवळ २५६ रुपये शिल्लक होते. तरीही त्याने या तरूणांना धनादेश दिले होते. खात्यात पैसे शिल्लक नसल्याने या धनादेशांचा अनादर झाला आहे. मालवणकरने याअगोदरही अशा प्रकारे काहींना फसवल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर तो भरणे येथील त्याच्या भाड्याच्या खोलीतून फरारी झाला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास न केल्याने मालवणकर फाईल अद्याप जैसे थे असल्याचे बोलले जात आहे.
फसवणूक झालेल्या बेरोजगार तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी पोलिसांना साकडे घालूनही याकामी पोलिसांना तपासात यश आले नाही. मालवणकर खेडमध्ये येऊनही त्याला पोलिसांनी हात लावला नाही, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या प्रकरणानंतर दोन पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत. नवे आलेले पोलीस निरीक्षक याबाबत बोलण्यास तयार नाहीत. यामुळे मालवणकर प्रकरणाची ही फाईल बंद केली की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.


1कोकण रेल्वेत नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे मोजणाऱ्यांची अवस्था दयनीय.
2खेड तालुक्यातील भामट्याचा तपास लावण्यात यंत्रणेला दोन वर्षे अपयश.
3मूळचा सिंधुदूर्गचा रहिवासी मात्र गेली पाच वर्षे राहात होता भरणे येथे.
4अनेकांना गंडा घालणाऱ्यावर खेड पोलिसांत दाखल झाला होता गुन्हा.

Web Title: Jayaraj Malwankar still scolded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.