सकारात्मक भावनेमुळेच कबड्डीला पसंती

By admin | Published: December 27, 2015 10:11 PM2015-12-27T22:11:54+5:302015-12-28T00:53:57+5:30

सचिन खांबे : सत्काराच्या कार्यक्रमातून उलगडले बालपण; गुणीजनांचाही सत्कार

Kabaddi is preferred due to positive sentiment | सकारात्मक भावनेमुळेच कबड्डीला पसंती

सकारात्मक भावनेमुळेच कबड्डीला पसंती

Next

खेड : बालपणातच कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली़ तेव्हापासून आजपर्यंत मी कबड्डी खेळत आहे़ शिक्षण सुरू असतानाच तालुका आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमधून ख्ोळण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे या खेळातील अभिरूची आणखी वाढली. या खेळामध्ये हातापायाला इजा होईल या भीतीने माझ्या आई-वडिलांनी मात्र कबड्डी खेळण्यात विरोध केला होता. हा विरोध गांभीर्याने न घेता मोठ्या आत्मविश्वासाने कबड्डी खेळाचा सराव मी सुरूच ठेवला. यामुळे विविध जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली़ या खेळामध्ये आवश्यक असलेली अविश्रांत मेहनत आणि सकारात्मक भावना आजही कायम ठेवल्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान मिळवता आला, असे राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन खांबे याने सांगितले.
खेड तालुक्यातील सुकिवली गावातील औदुंबर दत्त देवस्थानमध्ये आयोजित सन्मान वितरण सोहोळ्याप्रसंगी तो बोलत होता. कबड्डी खेळामध्ये आपण जाऊ नये, असा आई-वडिलांचा आग्रह होता. मात्र, त्यांची समजूत काढत आपण कबड्डी खेळामध्ये सर्वांच्या सहकार्याने उत्तम खेळ करत कबड्डी खेळावरील आपले प्रभुत्व आणखी मजबूत केल्याचे त्याने सांगितले़ यावेळी सचिन खांबे याचा दत्त देवस्थानचे संचालक श्रीकांत चाळके, आेंकार चाळके, महेश्वर चाळके, अक्षयकुमार चाळके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़ दत्त देवस्थानच्यावतीने करण्यात आलेल्या सत्काराने आपण भारावून गेलो आहे. दत्तगुरूंच्या साक्षीने झालेला हा सत्कार आपल्या आयुष्यातील मोठी शिदोरी असल्याचे त्याने सांगितले.
या सत्कारप्रसंगी मनोहर चाळके, भार्गव चाळके, गणेश चाळके, राजेंद्र चाळके, दत्ताराम चाळके, मनिषा चाळके, मंगेश चाळके, विलास दोरखडे, शारदा चाळके, प्रफुल्ल चाळके, श्रीकांत चव्हाण, दीपक चव्हाण, दीपक चाळके, सुभाष मोरे, सुरेश कदम, महेश चाळके, किशोर सावंत उपस्थित होते. यावेळी मुंबईतील पत्रकार एकनाथ बिरवटकर, तायक्वाँदोपटू सुनील शिंदे, प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवानी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सिध्दी चाळके, सिध्दी दोरखडे, प्रविणा चाळके यांनाही सन्मानित करण्यात आले़ (प्रतिनिधी)

सन २०१२ ते २०१५ दरम्यान बेंगलोर, भोपाळ, पटना येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये सचिन खांबे याने उत्तम खेळ केला़ २०१३मध्ये पटणा येथील स्पर्धेमध्ये त्याने महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती़ सलग ८ वर्ष त्याने राज्यातील विविध स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्हा संघाला प्रथम स्तरावर नेऊन ठेवले होते़ सन २०१३मधील प्रो - कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणूनही सन्मान मिळवला आहे़ मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याची ‘पुणेरी फलटन’ संघामध्ये निवड झाली आहे.

Web Title: Kabaddi is preferred due to positive sentiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.