काळसे लिंगेश्वर मंदिराचा कलशारोहण उत्साहात
By admin | Published: May 31, 2014 12:45 AM2014-05-31T00:45:07+5:302014-05-31T01:15:48+5:30
जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
चौके : मालवण तालुक्यातील काळसे येथील स्वयंभू श्री देव लिंगेश्वर मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा ३० मे रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात झाला. या कलशारोहण सोहळ््यानिमित्ताने ३० मे रोजी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. सकाळी गणपतीपूजन, संभारदान, पुण्याहवाचन, नांदी संप्रोशन विधी, तत्त्वज्ञानपूर्वक गणपती मूर्ती, नंदी व कासव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कलश संस्कार व होमहवन करण्यात आले. यावेळी काळसेचे सुपूत्र व मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते सपत्नीक श्री देव लिंगेश्वराची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर प.पू. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराज पिंगुळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प.पू. राजेंद्र स्वामी भारती महाराज मठाधिपती तळवणे मठ, राजगुरू सावंतवाडी संस्थान यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री देव लिंगेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा झाला. तत्पूर्वी कलशाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंदिराभोवती वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. कलशारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. काळसेच्या श्री देव लिंगेश्वराच्या कलशारोहणासाठी मुंबईचे महापौर तसेच श्री देव लिंगेश्वर मंदिर जीर्णाेद्धार समितीचे कार्याध्यक्ष सकाळपासून उपस्थित राहिल्यामुळे गावकरी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. सुनील प्रभू यांच्याबरोबरच अण्णा राऊळ महाराज, प.पू. राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या उपस्थितीने वातावरण भक्तीमय झाले होते. श्री देव लिंगेश्वर मंदिर जीर्णोद्घार कमिटी मुंबईचे अध्यक्ष मंगलदास प्रभू, सेक्रेटरी अॅड. संजय कोलगे, सहसेक्रेटरी सिताराम परब, चंद्रकांत दळवी, खजिनदार तातोबा प्रभू, सहखजिनदार गजानन प्रभू, उपाध्यक्ष मनोहर प्रभू, विनोद गोसावी, संदीप परब, विलास मेस्त्री, तुकाराम केळजी, मोहन शिंगरे, संतोष गुराम, प्रकाश प्रभू, अनिल प्रभू, संदीप माड्ये, सुरेश मयेकर, प्रवीण परब, प्रमोद मोरजकर व सर्व सदस्य, श्री देव रवळनाथ लिंगेश्वर देवालय ट्रस्ट काळसेचे अध्यक्ष विजय प्रभू, उपाध्यक्ष एकनाथ प्रभू, केशव सावंत, गजानन प्रभू, सचिव अशोक प्रभू, सहसचिव सिताराम परब, खजिनदार सिताराम शिवराम परब, सहखजिनदार प्रकाश नारायण प्रभू, सर्व सदस्य, डॉ. जी. ए. बुवा, प्रेमानंद प्रभू, चंद्रकांत प्रभू, मसुरे देवस्थानचे प्रमुख बाबुराव प्रभूगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तहसीलदार शरद गोसावी, विनोद गोसावी, महापौर सुनील प्रभू यांच्या पत्नी सायली प्रभू, ग्रामस्थ, भाविक या सोहळ््यासाठी उपस्थित होते. (वार्ताहर)