कोळंबला ‘डिजिटल केंद्राचा’ मान

By admin | Published: December 21, 2016 10:38 PM2016-12-21T22:38:48+5:302016-12-21T22:38:48+5:30

दोन शाळांचे आयएसओ नामांकनासाठी प्रस्ताव: मालवण पंचायत समितीकडून सत्कार

Kalambala 'Digital Center' value | कोळंबला ‘डिजिटल केंद्राचा’ मान

कोळंबला ‘डिजिटल केंद्राचा’ मान

Next

मालवण : कोळंब केंद्रातील जिल्हा परिषदेच्या अकराही शाळा डिजिटल बनल्या असून, कोळंब हे जिल्ह्यातील पहिले डिजिटल केंद्र बनले आहे. या शाळा डिजिटल बनविण्यासाठी माजी सभापती उदय परब व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पुढाकार घेतला होता. कोळंब केंद्राच्या या यशाबद्दल मालवण पंचायत समितीच्यावतीने कोळंब केंद्रप्रमुख अन्वर शेख, शिक्षक सरोजकुमार जैवळ, उदय परब यांचा सभापती हिमाली अमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती छोटू ठाकूर, सदस्य प्रसाद मोरजकर, देवानंद चिंदरकर, उदय परब, राजेंद्र प्रभुदेसाई, भाग्यता वायंगणकर, चित्रा दळवी, श्रद्धा केळुसकर, सीमा परुळेकर, सुजला तांबे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, वसंत महाले, उदय दीक्षित, विजय जाधव, आदी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शाळांना संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले.
माजी सभापती उदय परब यांनी स्वनिधीचा वापर करून डिजिटल शाळा बनविण्यासाठी पुढाकार घेतला, तर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वाधिक ३८ शाळा डिजिटल झाल्या. यात कोळंब केंद्राने जिल्ह्यातील पहिले डिजिटल केंद्र बनण्याचा मान मिळविला आहे.
याबाबत परब यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल झाल्या याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

शाळांची झेप
कोळंब केंद्रातील मधली रेवंडी शाळेला सर्वप्रथम आयएसओ मानांकन मिळाले होते. शिक्षकांची मेहनत व पंचायत समितीच्या सहकार्याने हे यश मिळविले होते. जिल्ह्यात पाच ते दहा शाळा आयएसओ मानांकन असून, नुकतेच घुमडे व काळसे-बागवाडा या दोन शाळांचे आयएसओ नामांकनासाठी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी मुळीक यांनी दिली.

Web Title: Kalambala 'Digital Center' value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.