कनेडी, फोंडा हायस्कूलचे वर्चस्व
By admin | Published: September 11, 2015 10:07 PM2015-09-11T22:07:32+5:302015-09-11T22:07:32+5:30
२७ संघांचा सहभाग : कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
खारेपाटण : क्रीडा युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कणकवली तालुका कबड्डी स्पर्धा खारेपाटण येथे पार पडल्या. या स्पर्धेत कनेडी, फोंडा हायस्कूलने आपल्या यशाचा झेंडा फडकवीत जिल्हास्तरीय स्पर्धेत मजल मारली.खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस झालेल्या या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील २७ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १४ वर्षीय ग्रामीण (पायका) मुली ४ संघ, १४ वर्षीय ग्रामीण (पायका) ६ संघ, १७ वर्षीय मुली ७ संघ, १७ वर्षीय मुलगे १0 संघ, तर १९ वर्षांखालील मुलांचा-मुलींच्या संघाचा विभागणी करून कबड्डी सामना खेळविला.विशेष करून सर्व गटांच्या प्रकारात कनेडी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच फोंडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी आपला दबदबा निर्माण केला. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख ए. डी. राणे यांच्या हस्ते झाले होते. गटशिक्षणाधिकारी ए. के. कांबळे उपस्थित होते. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव परवेज पटेल, सुधाकर कर्ले, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक योगिनी रानडे, खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, तालुका क्रीडा समन्वयक बयाजी बुरान, आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी रघुवीर
राणे, एस. एस. भोर, के. आर. पडवी, आदी शिक्षकांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)
कबड्डी स्पर्धेचे विजेते संघ पुढीलप्रमाणे :
१४ वर्षांखालील मुली करूळ हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता). १४ वर्षांखालील मुलगे एस. एम. हायस्कूल, कणकवली (विजेता), न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट (उपविजेता), १७ वर्षांखालील मुली कासार्डे हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता), १७ वर्षांखालील मुलगे फोंडा हायस्कूल (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेता), १९ वर्षांखालील मुले फोडाघाट कॉलेज (विजेता), खारेपाटण कॉलेज (उपविजेता). १९ वर्षांखालील मुली खारेपाटण कॉलेज (विजेता), कनेडी हायस्कूल (उपविजेते).