कणकवलीत व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, राहत्या घरी डोक्यावर पिस्तूल रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:37 PM2018-06-11T23:37:16+5:302018-06-12T00:12:48+5:30

चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने कणकवली शहरातील होलसेल व्यापाऱ्यावर रिव्हॉल्व्हरच्या सहाय्यानं हल्ला करण्याची घटना घडली आहे.

In Kankavali, a deadly attack on the trader, the pistols on his head were kept in the house | कणकवलीत व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, राहत्या घरी डोक्यावर पिस्तूल रोखले

कणकवलीत व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला, राहत्या घरी डोक्यावर पिस्तूल रोखले

googlenewsNext

कणकवली : चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्याने कणकवली शहरातील होलसेल व्यापाऱ्यावर रिव्हॉल्व्हरच्या सहाय्यानं हल्ला करण्याची घटना घडली आहे.  हल्ल्यात व्यापारी दत्तात्रय उर्फ बाबा गोवेकर (65) हे जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

कणकवली बाजार पेठेत होलसेल व्यापारी विद्यामंदिर हायस्कूलजवळ राहतात. सोमवारी रात्री ते दुकान बंद करून रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घरी गेले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजविला. त्यामुळे त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हर त्यांच्यावर रोखले. आपल्या घरी कोण आले आहे हे पाहण्यासाठी ते व्यापारी बाहेर आले असता त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील स्प्रे त्यांच्यावर फवारला.

तसेच काही समजायच्या आतच त्यांच्या डोक्यावर रिव्हॉल्व्हर मारली आणि तो पळून गेला. जखमी झालेल्या त्या व्यापाऱ्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. तोपर्यंत ती अज्ञात व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती. जखमी असलेल्या त्या व्यापाऱ्याला तेथिलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: In Kankavali, a deadly attack on the trader, the pistols on his head were kept in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.