कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांची विरोधकांबरोबर खडाजंगी!, ठेकेदार शिवसेना शहरप्रमुखाच्या अंगावर धावून गेला

By सुधीर राणे | Published: January 23, 2023 01:57 PM2023-01-23T13:57:51+5:302023-01-23T13:58:27+5:30

दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यातही शाब्दिक बाचाबाची

Kankavali Nagar Panchayat rulers dispute with opponents, The contractor Shiv Sena ran over the mayor | कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांची विरोधकांबरोबर खडाजंगी!, ठेकेदार शिवसेना शहरप्रमुखाच्या अंगावर धावून गेला

कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांची विरोधकांबरोबर खडाजंगी!, ठेकेदार शिवसेना शहरप्रमुखाच्या अंगावर धावून गेला

Next

कणकवली : कणकवली शहरामध्ये रेल्वे स्थानक रस्त्यावर काही दिवसापूर्वीच गटाराचे काम पूर्ण झाले होते. त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. तो रस्ता सोमवारी सकाळी मोठी पाण्याची पाईपलाईन फुटल्याने खचला. या विषयावरून कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. 

यावेळी शिवसेना कणकवली शहरप्रमुख उमेश वाळके यांनी काम थांबवा,हे काय करता?  असे विचारले असता ठेकेदार जावेद शेख त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठी बाचाबाची झाली. त्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरसेवक सुशांत नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. या दरम्यान सुशांत नाईक व नगराध्यक्ष यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली. 

त्यावेळी या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना देखील जाब विचारणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. कणकवली नगरपंचायतने रेल्वे स्थानक परिसरात गटारासाठी खोदलेला रस्ता काम झाल्यानंतर भराव टाकून पूर्ववत करण्यात आला होता. पण सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो रस्त्या खचून कणकवली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यावर रस्ता पुन्हा खचला. मात्र मोठा अनर्थ टळला.

यावेळी तत्परतेने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम तिथे पोहोचली. तसेच तेथील काम चालू केले. त्याचवेळी  विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना शहर प्रमुख उमेश वाळके, तेजस राणे, नगरसेवक कन्हैया पारकर हे देखील उपस्थित झाले. 

यावेळी संबधित काम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. यावेळी  नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक यांनी कडाडून विरोध करत निवडणुकीच्या तोंडावर विरोधक राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला. 

तर कामास तत्परतेने सुरुवात करत लवकरात लवकर पाईपलाईन दुरुस्त करून कणकवली शहराचा पाणीपुरवठा  सुरळीत करणार असल्याचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले. 
या दरम्यान ठेकेदार जावेद शेख हे उमेश वाळके यांच्या अंगावर धावून गेले असता त्यांना थांबवण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व सुशांत नाईक यांनी मध्यस्थी  केली व प्रकरण मिटवले. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची  झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, बाबू गायकवाड, कन्हैया पारकर, तेजस राणे तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Kankavali Nagar Panchayat rulers dispute with opponents, The contractor Shiv Sena ran over the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.