कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 04:58 PM2022-01-10T16:58:53+5:302022-01-10T17:00:24+5:30

भाजपने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच पारकर यांनी आपला राजीनामा स्वेच्छेने सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला आहे.

Kankavali Panchayat Samiti Deputy Chairman Prakash Parkar resigns | कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा

कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा

Next

कणकवली : कणकवली पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज, सोमवारी दिला आहे. भाजपने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच पारकर यांनी आपला राजीनामा स्वेच्छेने सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला आहे.

प्रकाश पारकर यांनी गेल्या वर्षात उपसभापती म्हणून महत्वपूर्ण असे काम केले आहे. ग्रामीण भागात जाऊन तेथील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा फायदा लाभार्थ्याना त्यांनी मिळवून दिला. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भजनी बुवा व पंचायत समिती सदस्य असलेल्या प्रकाश पारकर यांनी सातत्याने काम केले आहे. 

त्यामुळे पुढील काळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी. यासाठी स्वेच्छेने हा राजीनामा आपण दिला असल्याचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी सांगितले.

Web Title: Kankavali Panchayat Samiti Deputy Chairman Prakash Parkar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.