फोंडाघाटमध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई, ३२ हजाराच्या दारूसह मुद्देमाल जप्त
By सुधीर राणे | Published: October 11, 2022 11:46 AM2022-10-11T11:46:54+5:302022-10-11T11:47:15+5:30
कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल ३२ हजार ५८० रुपयांची अवैध गोवा बनावटीची ...
कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल ३२ हजार ५८० रुपयांची अवैध गोवा बनावटीची दारू व १५ हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल, सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट, हवेलीनगर) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार किरण मेथे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ७ बाटल्या, मॅकडॉल नंबर १व्हिस्कीच्या ३२ बाटल्या, हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी असे लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या ७२ बाटल्या, हायवड फाईन व्हिस्कीच्या ६१ बाटल्या, बॉब्स लेमन होडका ३० बाटल्या, रोमॅनो होडक्याच्या ३२ बाटल्या, गोल्डन आईस ब्लू फाईन व्हिस्कीच्या १३ बाटल्या, मेक डॉल नंबर १रमच्या १० बाटल्या, एक पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे करीत आहेत.