आमदार नितेश राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस, शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणाची करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 11:14 AM2021-12-23T11:14:52+5:302021-12-23T11:15:19+5:30
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी बजावली आहे.
कणकवली : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शनिवारी १८ डिसेंबर रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.
दरम्यान याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. आमदार राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून या चौकशी करता हजर राहतात का हे अद्यापही समजले नाही.
माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही
दरम्यान या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून पोलिसांनी चौकशीला बोलावले असल्याने आपण त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत असे राणे यांनी सांगितले.