कणकवली तालुका कृषी अधिकारीपद दोन वर्षे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:03 IST2021-03-26T17:02:06+5:302021-03-26T17:03:40+5:30
Agriculture Sector kankvali sindhudurg- कणकवली तालुक्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकंदर कामकाजावर परिणाम होत आहे. कणकवली तालुका कृषी अधिकारीपद गेली दोन वर्षे तर उपविभागीय कृषी अधिकारीपद वर्षभराहून अधिक काळ रिक्त आहे. या दोन्ही पदांवर एकच अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे कधी भरली जाणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कणकवली तालुका कृषी अधिकारीपद दोन वर्षे रिक्तच
कणकवली : तालुक्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकंदर कामकाजावर परिणाम होत आहे. कणकवली तालुका कृषी अधिकारीपद गेली दोन वर्षे तर उपविभागीय कृषी अधिकारीपद वर्षभराहून अधिक काळ रिक्त आहे. या दोन्ही पदांवर एकच अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे कधी भरली जाणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राठोड यांची दोन वर्षापूर्वी बदली झाली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारीपद रिक्त आहे. तर उपविभागीय कृषी अधिकारीपदी कार्यरत असलेले बागल यांची बदली झाल्यानंतर गेल्या वर्षभराहून अधिक काळ जात आहे . ते उपविभागीय कृषी अधिकारीपदही रिक्त आहे. तंत्र अधिकारी हजारे यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी या दोन्ही पदांचा प्रभारी पदभार गेल्या वर्षभरापासून आहे .
सांगवे, कणकवली व तळेरे या तीन ठिकाणी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एक अशी चार पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ तळेरे येथे एकमेव पद भरलेले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांबाबत माहिती मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कृषी विभागातील ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.