कणकवली तालुक्यात सर्वाधिक 58मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:30 PM2021-07-17T12:30:03+5:302021-07-17T12:30:45+5:30
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 28(2012), सावंतवाडी - 25(2221.10), वेंगुर्ला झ्र 50.60(1767.80), कुडाळ - 40(1965), मालवण - 49(2470), कणकवली - 58(2101), देवगड झ्र 51 (1842), वैभववाडी - 52(2025), असा पाऊस झाला आहे.
नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे
तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.400 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.500 मीटर आहे.
कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 5.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.
तिलारी धरण 83.39 टक्के भरले
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 373.0590 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.39 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 14.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 61.4930, अरुणा झ्र 51.4766, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.7633, ओटाव झ्र 1.6816, देंदोनवाडी झ्र 1.3560, तरंदळे झ्र 1.5280, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 3.2290, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 2.1470, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 1.5570, दाभाचीवाडी झ्र 2.2090, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.3300, कारिवडे झ्र 1.3850, धामापूर झ्र 2.4410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 1.3390, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.8850, शिरगाव झ्र 0.9760, तिथवली झ्र 1.7230, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.