कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:15 PM2020-12-23T17:15:45+5:302020-12-23T17:17:57+5:30
Kankavli Tourism News- कणकवली नगरपंचायतीमार्फत मागील दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवलीकरांचे मनोरंजनही होत असे. मात्र , कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली : कणकवली नगरपंचायतीमार्फत मागील दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवलीकरांचे मनोरंजनही होत असे. मात्र , कोरोनाच्या संकटामुळे कणकवली पर्यटन महोत्सव २०२१ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना अनुभवता येत होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये घेण्यात येत असलेला
कणकवलीकरांसाठी राबवीत असलेला हा उपक्रम येत्या वर्षी खंडित होत आहे. त्याबद्दल कणकवलीरांची दिलगिरी व्यक्त करतो.
मात्र, कोरोनाचे संकट संपल्यानंतर २०२२ मध्ये कणकवली पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा दिमाखाने आणि भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल.
कणकवली पर्यटन महोत्सवात गेल्या दोन वर्षात खाद्यसंस्कृती बरोबरच नामवंत कलाकारांची मांदियाळी कणकवलीकरांना याची देही याची डोळा अनुभवता आली होती. अनेक स्थानिक कलाकारांनाही या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या कलागुणांना संधी मिळाली होती. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्टॉलच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही होत होती. यामुळे बचतगटांसह अनेक स्थानिकांना रोजगाराची ही संधी निर्माण झाली होती.
मात्र, यावर्षीची कोरोनाचे संकट असल्यामुळे पर्यटन महोत्सवाला शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता नाही. त्यातच पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२१ मधला कणकवली पर्यटन महोत्सव रद्द करून त्या पुढील वर्षात दिमाखदारपणे साजरा करण्यात येईल. कणकवलीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले अशीच साथ द्यावी, असे आवाहनही समीर नलावडे यांनी या प्रसिध्दीपत्रकातून केले आहे.