सिंधुदुर्ग : करुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक, दोन्ही चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:41 PM2018-12-31T12:41:55+5:302018-12-31T12:43:36+5:30

करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीक आरामबस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Karol Ghatpayatha injured in both drivers injured in the truck | सिंधुदुर्ग : करुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक, दोन्ही चालक जखमी

सिंधुदुर्ग : करुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक, दोन्ही चालक जखमी

Next
ठळक मुद्देकरुळ घाटपायथ्याला आरामबसची ट्रकला धडक दोन्ही चालक जखमीजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु; वाहनांचे मोठे नुकसान

वैभववाडी : करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीक आरामबस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हा अपघात सकाळी सव्वासातच्या सुमारास घडला. दरम्यान आरामबस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

गणेश शंकर जाधव(33, रा. सातारा) व निलेश अनंत पवार(27, रा. दत्तनगर, वैभववाडी) अशी जखमी चालकांची नावे आहेत. यातील निलेश पवार याला गंभीर दुखापत झाली आहे. तर गणेश जाधव याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

कासार्डे येथून सिलिका वाळू भरलेला ट्रक(एम.एच.07; पी-1982) घेऊन निलेश पवार कोल्हापूरला निघाला होता. आरामबस(एम.एच.08; ई- 9992) मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जात होती.

करुळ घाटपायथ्याशी दिंडवणे फाट्यानजीकच्या वळणावर आरामबसने ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ट्रक आणि आरामबसच्या केबीनचा चुराडा झाला. गावातील प्रदीप पडवळ, हेमंत पाटील, प्रज्वल गायकवाड, गौरव मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास सहकार्य केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजू जामसंडेकर, पोलीस नाईक राजेंद्र खेडकर, शरद इंजुलकर अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरुन अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. या अपघात प्रकरणी आरामबस चालक गणेश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून हवालदार राजू जामसंडेकर या अपघाताचा तपास करीत आहेत.

Web Title: Karol Ghatpayatha injured in both drivers injured in the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.