पथनाट्यामध्ये कट्टा, साळगाव प्रथम
By admin | Published: December 24, 2015 10:19 PM2015-12-24T22:19:26+5:302015-12-25T00:05:27+5:30
उडान महोत्सवानिमित्त स्पर्धा : जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा सहभाग
वैभववाडी : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आयोजित ‘उडान महोत्सवा’च्या पथनाट्य स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा-मालवण व जयहिंद कॉलेज साळगाव-कुडाळ तर पोस्टर्स स्पर्धेत आचरा व्यवस्थापन कॉलेज व कणकवली कॉलेजने बाजी मारली. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात झालेल्या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा सहभाग होता.
विविध प्रकल्पांवर आधारित १२ पथनाट्यांचे सादरीकरण व २५ पोस्टर्सचे प्रदर्शन करण्यात आले होते. उडान महोत्सवाचा निकाल पुढीलप्रमाणे- पथनाट्य स्पर्धा : प्रथम दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा-मालवण व जयहिंद कॉलेज साळगाव कुडाळ, द्वितीय श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी व संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, तृतीय आचरा व्यवस्थापन महाविद्यालय आचरा, व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ व दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय पणदूर, उत्तेजनार्थ- रावसाहेब गोगटे-वाळके कॉलेज बांदा, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज सावंतवाडी, कणकवली कॉलेज कणकवली, प्रमोद रवींद्र्र धुरी अध्यापक महाविद्यालय साळगाव यांनी पथनाट्य स्पर्धेत यश मिळवले.
उडान महोत्सवात उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. कुणाल जाधव, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, डॉ. शिवाजीराव आकेळकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सी. डी. भेंकी, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.
अनिल चव्हाण, अनिल काटकर यांनी पथनाट्यांचे तर एस. आर. चोरगे, योगेश रावराणे यांनी पोस्टर्स स्पर्धेचे परिक्षण केले. (प्रतिनिधी)
पोस्टर स्पर्धा : आचरा व्यवस्थापन कॉलेज प्रथम
पोस्टर्स स्पर्धा : प्रथम आचरा व्यवस्थापन कॉलेज आचरा, कणकवली कॉलेज कणकवली, द्वितीय श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, फोंडाघाट कॉलेज, तृतीय डॉ. दादासाहेब वराडकर महाविद्यालय कट्टा -मालवण, दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय - पणदूर, उत्तेजनार्थ आचरा व्यवस्थापन कॉलेज - आचरा, फोंडाघाट कॉलेज - फोंडाघाट, तोंडवली अद्यापक विद्यालय - तोंडवली, बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले यांनी यश मिळवले.