अंडरपासचा निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवा-कणकवलीतील नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 07:26 PM2019-05-04T19:26:04+5:302019-05-04T19:27:10+5:30

कणकवली शहरातील गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि टेंबवाडी रस्ता मुंबई -गोवा महामार्गाला जोडला जात आहे. त्यामुळे गांगो मंदिरनजीक अंडरपास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद

Keep the work closed till the decision of the underpass - the people of Kankavali | अंडरपासचा निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवा-कणकवलीतील नागरिकांची मागणी

कणकवली नगरपंचायत कार्यालयात गांगोमंदिर येथे अंडरपास उभारण्याबाबत शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी रवींद्र गायकवाड, बंडू हर्णे, अभिजित मुसळे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देगांगोमंदिरजवळील महामार्ग चौपदरीकरण काम

कणकवली : कणकवली शहरातील गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि  टेंबवाडी रस्ता मुंबई -गोवा महामार्गाला जोडला जात आहे. त्यामुळे गांगो मंदिरनजीक अंडरपास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद ठेवा. अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा कणकवली शहरवासीयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिला. 

कणकवली नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, बांधकाम सभापती अभिजित मुसळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता गणेश महाजन,  नगरपंचायतीचे अधिकारी तसेच शिशिर परुळेकर, रामदास मांजरेकर, अभय राणे, अनिल शेट्ये, सोमनाथ गायकवाड, परेश परब, संदीप नलावडे, चंद्रशेखर चव्हाण, आनंद राणे, पिंट्या चव्हाण, एकावडे, ललित राणे, औदुंबर राणे आदी नागरिक आणि व्यापाºयांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांना संबधित इशारा दिला.

यावेळी बंडू हर्णे म्हणाले, गांगो मंदिरसमोर मसुरकर किनई लेन रोड आणि टेंबवाडी रस्ता मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जात आहे. हे  दोन्ही रोड एकत्र येत असल्यामुळे त्या ठिकाणी चौक तयार होत आहे.  हा चौक  शहरातील उड्डाणपुलाच्या रेंजमध्ये येत आहे. त्यामुळे गांगोमंदिर परिसरातील नागरिक  आणि शेकडो व्यापाºयांची ये- जा करताना गैरसोय होणार आहे. तसेच कणकवली शहराच्या विकास आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या या रस्त्यांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे  नागरिकांची  गैरसोय दूर करण्यासाठी या ठिकाणी  अंडरपास मंजूर करण्यात यावा. तसेच संबधित निर्णय होत नाही तोपर्यंत तेथील काम बंद ठेवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. या विषयासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर तसेच कार्यकारी अभियंता बनगोसावी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. तसेच नगरपंचायतीकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे देण्यात येतील, असेही बंडू हर्णे यांनी सांगितले. यावेळी बनगोसावी यांनी ७ मे रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता तसेच वरिष्ठ अधिकाºयांची बैठक असून त्यावेळी आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यात येईल असे सांगितले. तसेच ७ मे पर्यंत संबधित ठिकाणचे काम बंद ठेवण्याचेही कबूल केले. त्यामुळे संतप्त नागरिक काहीसे शांत झाले.

उड्डाणपुलाची परिपूर्ण माहिती द्या!
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाअंतर्गत कणकवलीत उभारण्यात येणाºया उड्डाणपुलाची परिपूर्ण माहिती नागरिकांना द्या, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांकडे केली.


कणकवलीवासीयांना कमी लेखू नका!
गांगोमंदिर येथे महामार्गावर अंडरपास  होणे हा कणकवलीवासीयांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा अंडरपास न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. कणकवली शहरात महामार्गाचे काम करू दिले जाणार नाही. आमच्यावर पोलीस कारवाई झाली तरी मागे हटणार नाही. त्यामुळे कणकवलीवासीयांना तुम्ही कमी लेखू नका, असे यावेळी उपस्थित नागरिकांनी अधिकाºयांंना ठणकावून सांगितले.


 

Web Title: Keep the work closed till the decision of the underpass - the people of Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.