बंदरांच्या सुविधांसाठी प्रस्ताव द्या केसरकर यांचे आदेश :

By admin | Published: December 15, 2014 07:54 PM2014-12-15T19:54:19+5:302014-12-16T00:16:52+5:30

मेरिटाईम बोर्डाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करा

Kesarkar's order to offer port facilities: | बंदरांच्या सुविधांसाठी प्रस्ताव द्या केसरकर यांचे आदेश :

बंदरांच्या सुविधांसाठी प्रस्ताव द्या केसरकर यांचे आदेश :

Next

 मालवण : मालवण बंदर पायाभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. मालवण शहर हे मासेमारी बंदराला लागून आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा देणे शक्य आहे. यासाठी केंद्र सरकारच्या एनएफडीबीअंतर्गत मेरिटाईम बोर्डाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, अशा प्रकारचे आदेश वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काल, रविवारी मालवणला भेट दिली. या भेटीप्रसंगी केसरकर यांचे तेथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मालवण येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी केसरकर यांनी चर्चा केली. ते म्हणाले, मालवणमध्ये मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय चालतो. या व्यवसायातून परकीय चलनही प्राप्त होते, अशा परिस्थितीत येथील मच्छिमारांना अद्ययावत जेटी त्यावर पाणी, बर्फ, इंधनाची सुविधा, मासे उतरविण्याची व्यवस्था, अशा प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठीर् ंएनएफडीबीअंतर्गत मेरिटाईम बोर्डाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. यावेळी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राजा गावकर, दीपक मयेकर, किरण वाळके, नंदू गवंडी, नगरसेविका सेजल परब, चारूशिला आचरेकर, दीपा सावंत, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त सुगंधा चव्हाण, नायब तहसीलदार जी. के. सावंत, परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रदीप पाटील, कमलिनी प्रभू, लघुपाटबंधारे विभागाचे पाडगावकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, बाबी जोगी, आदी उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर म्हणाले, मालवण शहरातील तहसीलदार कचेरीपासून फोवकांडा पिंपळमार्गे भरड येथे येणारा राज्यमार्ग ११८चे रूंदीकरण होणे गरजेचे आहे. या रस्त्याचे रूंदीकरण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न संपुष्टात येईल. हा रस्ता नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावा, असे सांगून जावकर म्हणाले, गेली पाच वर्षे नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी गटार योजना लवकर मार्गी लागण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. निवती समुद्रात घडलेल्या पर्ससिननेट आणि पारंपरिक मच्छिमारांच्या वादावर अधिकाऱ्यांना सूचना करताना केसरकर यांनी, पारंपरिक मच्छिमारांना भादंवि कलम ३०७ लावून नाहक गुंतवू नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. निवती समुद्रात मच्छिमारांमध्ये घडलेला संघर्ष हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. मत्स्य व्यवसाय तसेच प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावली असती, तर मच्छिमारांना कायदा हातात घेण्याची वेळ आली नसती. जे मच्छिमार नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करा. आज ज्याप्रमाणे बेकायदेशीर मासेमारीवर मत्स्य विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे त्या कारवाईत सातत्य ठेवा, असे आदेश त्यांनी मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी) त्यांना हद्दपार करा मालवण ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांना झालेल्या मारहाणीच्या अनुषंगाने दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात डॉक्टरांना मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. ही बाब चुकीची असून, यापुढे डॉक्टरांना मारहाण झाल्यास मारहाण करणाऱ्यांना हद्दपार करा, असे आदेश पोलीस यंत्रणेला दिले.

Web Title: Kesarkar's order to offer port facilities:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.