शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही

By Admin | Published: February 20, 2016 12:13 AM2016-02-20T00:13:55+5:302016-02-20T00:40:23+5:30

सुनील पवार : शिवजयंतीचे औचित्य साधत कुडाळात रॅलीसह विविध कार्यक्रम

A King does not fall like Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही

शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही

googlenewsNext

कुडाळ : हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करणे आपल्या सर्वांचे काम आहे. असा राजा पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी शुक्रवारी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने दुचाकी रॅलीने भगवामय वातावरण निर्मिती शहारात करण्यात आली.
शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून मराठा समाज कुडाळच्यावतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिवप्रेमींनी भगवे फेटे बांधले होते. जय भवानी जय शिवाजी व हरहर महादेवाच्या नामघोषाने शहर परिसर दुमदुमला. शहरातील सावंत प्रभावळकरवाडा येथून मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. जिजामाता चौक येथे अ‍ॅड. निलांगी रांगणेकर यांच्या हस्ते जिजामाता पुतळ्यास तर शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुनील पवार, अ‍ॅड. सुहास सावंत, सुंदर सावंत यांनी पुष्पहार घातला. यावेळी मराठा समाजाचे संग्राम सावंत, गोविंद सावंत, बंड्या सावंत, डॉ. संदीप पाटील, लवू सावंत, रूपेश कानडे, प्रशांत राणे, विनायक राणे, सचिन सावंत, बापू सावंत, बंटी तुळसकर, विजय सावंत, नितीन सावंत, शिवराम सावंत, बाळा सावंत, शिवप्रेमी उपस्थित होते. मोटारसायकल रॅली शहर बाजारपेठ ते गांधीचौक अशी काढण्यात आली.
यावेळी पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठा समाज हिंदू धर्मावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येकाचे काम आहे. हिंदुस्थानात असा राजा झाला नाही आणि पुढे होणे नाही. त्यांचे कार्य प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे. भविष्यात त्यांची पुढील जयंती ही दिमाखात विविध कार्यक्रमाने साजरी केली जाईल, असे
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: A King does not fall like Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.