गडनदीवरील किर्लोस बंधारा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 03:56 PM2021-06-16T15:56:03+5:302021-06-16T15:57:54+5:30
Rain Sindhudurg : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदी पूर्णपणे भरून वाहू लागली असून आचरा मार्गावरील किर्लोस -गोठणे गाव जोडणारा गडनदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने किर्लोस व गोठणे गावचा संपर्क तुटला आहे.
कणकवली : गेले 3 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडनदी पूर्णपणे भरून वाहू लागली असून आचरा मार्गावरील किर्लोस -गोठणे गाव जोडणारा गडनदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने किर्लोस व गोठणे गावचा संपर्क तुटला आहे.
सिंधुदुर्गात गेले 3 दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून काल पासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
कणकवली आचरा मार्गावर अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आचरा मार्गावरील गोठणे येथील किर्लोस व अन्य गावांना जोडणाऱ्या कोल्हापूर टाइप म्हणजेच केटी बांधाऱ्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे.