सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे

By सुधीर राणे | Published: April 29, 2023 05:07 PM2023-04-29T17:07:29+5:302023-04-29T17:16:04+5:30

संस्कृती संवर्धन मंच कणकवलीच्या कीर्तन महोत्सवाचे शानदार उद्घाटन 

Kirtan is an effective medium for public enlightenment in the present age says MLA Nitesh Rane | सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे

सध्याच्या युगात जनप्रबोधनासाठी कीर्तन प्रभावी माध्यम - आमदार नितेश राणे

googlenewsNext

कणकवली: सध्याच्या सोशल मीडिया, युट्युबच्या जमान्यात वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आपण सगळी माध्यमे वापरतो. पण आजही छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थाने इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा असेल, तर जनप्रबोधनासाठी कीर्तन हे महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. 

शिवरायांचा खरा इतिहास हा प्रत्येक पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि समजलाच पाहिजे. काहीजण इतिहासाच्या निमित्ताने चुकीची माहिती मांडतात. काहीजण बोलतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. तर कोण अफजल खान, औरंगजेब यांच्या विचारांचा उदोउदो करत आहेत. या हिंदू विरोधी विचारांना मोठ करण्याचे काम काहींजणाकडून चालू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये व वातावरणामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय घराघरात पोचविण्याचा उपक्रम महत्वाचा आहे असेही ते म्हणाले. 

संस्कृती संवर्धन मंच, कणकवलीच्यावतीने विद्यामंदिर हायस्कुलच्या मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प.चारुदत्त आफळे बुवा हे कीर्तन करणार आहेत. त्यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, भाजपा जिल्हा सचिव मनोज रावराणे, संस्कृती संवर्धन मंच अध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. 

यावेळी आमदार राणे म्हणाले, शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा म्हणून मला खऱ्या अर्थाने आज समाधान वाटत आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये तसेच माझ्या कणकवलीमध्ये कीर्तन महोत्सव होतोय. तोही छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आहे. हे आमचे भाग्य आहे.  याचा फायदा भावी पिढीला निश्चित होणार आहे असा विश्वास व्यक्त केला

Web Title: Kirtan is an effective medium for public enlightenment in the present age says MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.