किशोर तावडे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी; के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरला बदली 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 22, 2023 02:13 PM2023-08-22T14:13:42+5:302023-08-22T16:05:43+5:30

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे नवे ...

Kishore Tawde is the new Collector of Sindhudurg; K. Manjulakshmi transferred to Kolhapur | किशोर तावडे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी; के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरला बदली 

किशोर तावडे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी; के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूरला बदली 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली. के. मंजुलक्ष्मी तब्बल साडे पाच वर्षे सर्वाधिक काळ जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करणाऱ्या अधिकारी ठरल्या आहेत. कोरोना काळातील त्याचे कार्य सर्वोत्तम ठरले आहे. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना नियुक्ती शासनाने केली आहे.

के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली. त्यानंतर आता त्यांची बदली झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्ष आणि जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष सहा महिने त्या राहिल्या आहेत.

आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक काळ त्या जिल्ह्यात राहिल्या आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जिल्ह्यात काम केलेल्या पाच अधिकाऱ्यांना जिल्ह्यातच जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली. कोरोना काळात सर्वोत्कृष्ट काम केले. त्यांच्या काळातच सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला. त्याबद्दल त्यांचा दिल्लीत गौरव झाला होता.

Web Title: Kishore Tawde is the new Collector of Sindhudurg; K. Manjulakshmi transferred to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.