शिवसैनिक, माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला, जिल्हा बँक निवडणुकीची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 12:54 PM2021-12-18T12:54:23+5:302021-12-18T13:47:47+5:30
संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वादातून की अन्य कारणाने याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गजबजलेल्या नरडवे रोड वर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी इनोव्हा कारने पाठीमागून ठोकर देत अपघात केला. मोटरसायकल वरून परब खाली कोसळताच त्यांच्यावर धारधार सुरीने हल्ला करण्यात आला. या घेतनेने कणकवली बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली येथून संतोष परब येथून शिवशक्ती नगर येथील रूमवर जात होते. त्यावेळी हल्ला त्यांच्यावर झाला. तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. संतोष परब यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेकडो कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये संतोष परब बोलताना सांगत होते. संशयित आरोपी हे दोघेजण होते. सिल्व्हर कलरची इनोव्हा कार नरडवे रोड वरून कनेडी च्या दिशेने निघाली आहे .त्याच्या ऑफ वाईट शर्ट होते. जखमी संतोष परब यांच्या छातीवर वार करण्यात आला आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, संजय पारकर, संजय सावंत, दामोदर सावंत, अमित मयेकर, अनिल खोचरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने गोळा झाले आहेत.