अर्थव्यवस्थेचा कणाही समस्यांच्या विळख्यातच

By admin | Published: March 18, 2016 10:43 PM2016-03-18T22:43:12+5:302016-03-18T23:31:33+5:30

प्रशासनाची दुरूस्तीला बगल : ग्रामस्थांसह वाहनधारकांतून संताप ; दोडामार्गातील बाजारपेठांची विदारक अवस्था--दोडामार्गच्या विकासाची दिशा

Knowledge of any kind of economy | अर्थव्यवस्थेचा कणाही समस्यांच्या विळख्यातच

अर्थव्यवस्थेचा कणाही समस्यांच्या विळख्यातच

Next

वैभव साळकर -- दोडामार्ग --तालुकावासीयांच्या साटेली-भेडशी व दोडामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या बाजारपेठा नियोजन अभावामुळे समस्यांनी वेढल्या आहेत. जागेची कमतरता, वाहनांची कोंडी, किरकोळ घडणारे अपघात आदी समस्यांनी या बाजारपेठांना वेढले आहे. तालुक्याची अर्थव्यवस्था बळकटी देणाऱ्या या दोन्ही बाजारपेठा म्हणजे व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्यांचा आर्थिक कणा असूनही या बाजारपेठांच्या दुरूस्तीकडे कुणीच गांभिर्याने लक्ष दिले नाही. परिणामी तालुकावासीयांंची जीवनदायिनी ठरलेल्या या बाजारपेठांच्या दुरावस्थेबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तालुका ठिकाणची दोडामार्ग आणि पूर्वकाळापासूनची साटेली-भेडशी या दोन्ही बाजारपेठा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तालुक्यातील या दोन्ही बाजारपेठात शनिवार व रविवारी आठवडा बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांचा आठवडा बाजार भरत असतानाही स्वच्छ ‘मार्केट’चा प्रश्न मात्र अद्याप कोठेही मार्गी लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढती नागरीवस्ती, रूंदावती बाजारपेठेची कक्षा आणि ‘बाजाराची परिस्थिती’ आहे तीच आहे. अशी विदारक स्थिती दोडामार्ग तालुक्यातील या दोन्ही बाजारपेठांत पहावयास मिळते. मात्र, या सर्व ‘यातनामय’ समस्यांवर मात करत तालुक्यातील नागरिकांना शेवटी ‘बाजारहाट’ करावाच लागते. साटेली-भेडशी आणि दोडामार्ग या बाजारपेठा मुख्यत्वे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फा वसलेल्या आहेत आणि आठवडा बाजाराचाही ‘थाट’ याच मार्गाच्या दुतर्फा उभारला जातो. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी या मार्गावरून वाहने हाकण्याचे काम वाहनचालकांना मोठ्या जिकरीने करावे लागते. नागरिकांनाही राज्यमार्गावर ‘बस्थान’ मांडलेल्या व्यापाऱ्यांकडून बाजार खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सारे काही आलबेल आणि नागरिक हताश असे चित्र पहावयास मिळते.
एरवी दरदिवशी दोडामार्ग गांधीचौक ते तिलारी रोडवर पंचायत समिती कार्यालयापर्यंत राज्यमार्गावर मोकळ्या जागेत मालवाहतूक, एस.टी. गाड्या आणि प्रवासी वाहतूक करणारी सर्व वाहने तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारादिवशी बाजाराला जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात आणि वाहनांची जागा व्यापारी बळकावतात. सगळीकडे त्यांचेच बस्तान असते. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो. ग्रामपंचायत व्यापाऱ्यांकडून ‘व्यवसाय’ करही वसूल करते. मात्र, बाजारपेठेचा प्रश्न काही मार्गी लावत नाही. म्हणून व्यापाऱ्यांत नाराजी आणि यातनामय प्रवासातून बाजार करावा लागतो. म्हणून नागरिकांत नाराजी अशी ‘दयनीय’ अवस्था सगळ्यांचीच बाजारदिवशी होताना दिसते.
साटेली-भेडशीतील स्थिती तर दोडामार्गपेक्षा बिकट आहे. तालुक्यातील एकूण ५६ गावांपैकी ३० ते ३५ गावांचा बाजार याच बाजारपेठेतून होतो. सर्वात जुनी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या या बाजारपेठेची अवस्थाही आजघडीलाही पूर्वीसारखीच आहे. संपूर्ण दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फाच ही बाजारपेठ आहे, बाजारादिनी येणाऱ्या व्यावसायिक राज्यमार्गाच्या दुतर्फाच आपले बस्तान मांडतात. त्यामुळे तेथेही नागरिक आणि वाहनाचालक यांना मोठी कसरत करावी लागते. तर व्यापारीही या कसरतीतून सुटलेली नाही म्हणा. साटेली-भेडशी बाजारपेठेत रस्त्यांच्या गटारांअभावी पावसाचे बाजारपेठ आणि रस्त्यावर घुसणारे पाणी त्यांना नाकीदम आणते. नागरिकांना तर नाक मुरडत बाजार करावा लागतो. मात्र, याचे सोयरसुतक ना स्थानिक ग्रामपंचायतीला ना तेथील पुढारीमंडळी आणि लोकप्रतिनिधींना आहे. मात्र, ‘यातनामय’ प्रवासातून बाजार करणाऱ्या नागरिकांतून दोन्ही बाजारपेठाबाबत तीव्र नाराजी आहे.
बाजार व्यवसायाचा कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायतीचीही तितकीच जबाबदारी आहे. दोडामार्ग व साटेली-भेडशी येथील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतल्यास या दोन्ही बाजारपेठेतील आठवडा बाजारांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. दोडामार्ग येथे प्राथमिक शाळेचे पटांगण रविवारी बजारादिवशी व्यावसायिकांना खुले करून दिल्यास हा प्रश्न दोडामार्गात मार्गी लागू शकतो. तर साटेली-भेडशीत बाजार भरण्यासाठी तीन मोठ्या जागा आहेत. न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण, मराठी शाळेसमोरील पटांगण आणि ग्रामपंचायत - तलाठी कार्यालयालगतची मोकळी जागा सर्वांच्याच सोयीचे होतील. त्यासाठी येथील ग्रामपंचायतींने प्रयत्न व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल.

अर्थव्यवस्थेचा कणाही समस्यांच्या विळख्यातच
प्रशासनाची दुरूस्तीला बगल : ग्रामस्थांसह वाहनधारकांतून संताप ; दोडामार्गातील बाजारपेठांची विदारक अवस्था--दोडामार्गच्या
विकासाची दिशा
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
तालुकावासीयांच्या साटेली-भेडशी व दोडामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या बाजारपेठा नियोजन अभावामुळे समस्यांनी वेढल्या आहेत. जागेची कमतरता, वाहनांची कोंडी, किरकोळ घडणारे अपघात आदी समस्यांनी या बाजारपेठांना वेढले आहे. तालुक्याची अर्थव्यवस्था बळकटी देणाऱ्या या दोन्ही बाजारपेठा म्हणजे व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्यांचा आर्थिक कणा असूनही या बाजारपेठांच्या दुरूस्तीकडे कुणीच गांभिर्याने लक्ष दिले नाही. परिणामी तालुकावासीयांंची जीवनदायिनी ठरलेल्या या बाजारपेठांच्या दुरावस्थेबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तालुका ठिकाणची दोडामार्ग आणि पूर्वकाळापासूनची साटेली-भेडशी या दोन्ही बाजारपेठा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तालुक्यातील या दोन्ही बाजारपेठात शनिवार व रविवारी आठवडा बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांचा आठवडा बाजार भरत असतानाही स्वच्छ ‘मार्केट’चा प्रश्न मात्र अद्याप कोठेही मार्गी लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढती नागरीवस्ती, रूंदावती बाजारपेठेची कक्षा आणि ‘बाजाराची परिस्थिती’ आहे तीच आहे. अशी विदारक स्थिती दोडामार्ग तालुक्यातील या दोन्ही बाजारपेठांत पहावयास मिळते. मात्र, या सर्व ‘यातनामय’ समस्यांवर मात करत तालुक्यातील नागरिकांना शेवटी ‘बाजारहाट’ करावाच लागते. साटेली-भेडशी आणि दोडामार्ग या बाजारपेठा मुख्यत्वे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फा वसलेल्या आहेत आणि आठवडा बाजाराचाही ‘थाट’ याच मार्गाच्या दुतर्फा उभारला जातो. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी या मार्गावरून वाहने हाकण्याचे काम वाहनचालकांना मोठ्या जिकरीने करावे लागते. नागरिकांनाही राज्यमार्गावर ‘बस्थान’ मांडलेल्या व्यापाऱ्यांकडून बाजार खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सारे काही आलबेल आणि नागरिक हताश असे चित्र पहावयास मिळते.
एरवी दरदिवशी दोडामार्ग गांधीचौक ते तिलारी रोडवर पंचायत समिती कार्यालयापर्यंत राज्यमार्गावर मोकळ्या जागेत मालवाहतूक, एस.टी. गाड्या आणि प्रवासी वाहतूक करणारी सर्व वाहने तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारादिवशी बाजाराला जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात आणि वाहनांची जागा व्यापारी बळकावतात. सगळीकडे त्यांचेच बस्तान असते. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो. ग्रामपंचायत व्यापाऱ्यांकडून ‘व्यवसाय’ करही वसूल करते. मात्र, बाजारपेठेचा प्रश्न काही मार्गी लावत नाही. म्हणून व्यापाऱ्यांत नाराजी आणि यातनामय प्रवासातून बाजार करावा लागतो. म्हणून नागरिकांत नाराजी अशी ‘दयनीय’ अवस्था सगळ्यांचीच बाजारदिवशी होताना दिसते.
साटेली-भेडशीतील स्थिती तर दोडामार्गपेक्षा बिकट आहे. तालुक्यातील एकूण ५६ गावांपैकी ३० ते ३५ गावांचा बाजार याच बाजारपेठेतून होतो. सर्वात जुनी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या या बाजारपेठेची अवस्थाही आजघडीलाही पूर्वीसारखीच आहे. संपूर्ण दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फाच ही बाजारपेठ आहे, बाजारादिनी येणाऱ्या व्यावसायिक राज्यमार्गाच्या दुतर्फाच आपले बस्तान मांडतात. त्यामुळे तेथेही नागरिक आणि वाहनाचालक यांना मोठी कसरत करावी लागते. तर व्यापारीही या कसरतीतून सुटलेली नाही म्हणा. साटेली-भेडशी बाजारपेठेत रस्त्यांच्या गटारांअभावी पावसाचे बाजारपेठ आणि रस्त्यावर घुसणारे पाणी त्यांना नाकीदम आणते. नागरिकांना तर नाक मुरडत बाजार करावा लागतो. मात्र, याचे सोयरसुतक ना स्थानिक ग्रामपंचायतीला ना तेथील पुढारीमंडळी आणि लोकप्रतिनिधींना आहे. मात्र, ‘यातनामय’ प्रवासातून बाजार करणाऱ्या नागरिकांतून दोन्ही बाजारपेठाबाबत तीव्र नाराजी आहे.
बाजार व्यवसायाचा कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायतीचीही तितकीच जबाबदारी आहे. दोडामार्ग व साटेली-भेडशी येथील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतल्यास या दोन्ही बाजारपेठेतील आठवडा बाजारांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. दोडामार्ग येथे प्राथमिक शाळेचे पटांगण रविवारी बजारादिवशी व्यावसायिकांना खुले करून दिल्यास हा प्रश्न दोडामार्गात मार्गी लागू शकतो. तर साटेली-भेडशीत बाजार भरण्यासाठी तीन मोठ्या जागा आहेत. न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण, मराठी शाळेसमोरील पटांगण आणि ग्रामपंचायत - तलाठी कार्यालयालगतची मोकळी जागा सर्वांच्याच सोयीचे होतील. त्यासाठी येथील ग्रामपंचायतींने प्रयत्न व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल.
दोन्ही बाजारपेठांचा भौगोलिक स्थितीचा विचार करता तालुका ठिकाणच्या बाजारपेठांचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
दोडामार्ग बाजारपेठेत राज्यमार्गावर दुकाने थाटल्याने वाहतुकीबरोबर ग्राहकांची कोंडी होत आहे.
तिलारी-गोवा, बांदा-आयी गांधीचौकातून चारही दिशांनी जाणाऱ्या हमरस्त्यांवर बाजारपेठ विस्तारली आहे खरी; मात्र, दोडामार्गचा आठवडा बाजार दुतर्फाच भरला जातो.
दोडामार्गात आठवडा बाजारादिवशी वाहने हाकणे आणि वाहने पार्क करणे चालकांना नाकी दम येतात.

Web Title: Knowledge of any kind of economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.