कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:04 PM2018-12-19T15:04:15+5:302018-12-19T15:12:01+5:30

कणकवली : सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांच्या देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील स्मारकाचा उदघाट्न सोहळा ३० डिसेंबर रोजी ...

Kokan Kala Bhushna Chandrakant Kadam memorial commemorates 30th anniversary | कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्न

कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्न

googlenewsNext
ठळक मुद्देकोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्नआरे फाटा येथे कार्यक्रम ; प्रकाश पारकर यांची माहिती

कणकवली : सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांच्या देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील स्मारकाचा उदघाट्न सोहळा ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य व प्रसिध्द भजनी बुवा प्रकाश पारकर यांनी कणकवली येथे दिली.

यावेळी भजनी बुवा शशिकांत राणे, ज्ञानदेव मेस्त्री, समीर कदम, दिगंबर मेस्त्री, सुदर्शन फोपे, दीपक मुंडले, मयूर ठाकुर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकण कलाभुषण सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांनी लोककलेतील डबलबारी भजनाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या स्मृतिंचे कायम स्वरूपी जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातील त्यांचे शिष्य तसेच गुरुदास परिवारातील सदस्यानी आरे फाटा येथे त्यांचे स्मारक उभारले आहे. 

यावेळी प्रकाश पारकर म्हणाले, राज्यभरात अनेक संतांची स्मारके आहेत. पण अध्यात्माचा प्रबोधन तसेच भजनाची सांगड घालून प्रसार करणाऱ्या भजनी बुवांचे स्मारक कुठेही नाही. भजनाच्या माध्यमातून अध्यात्माची आवड़ निर्माण करणाऱ्या या भजन सम्राटांची पुढील पिढीला ओळख व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी कोकण कलाभुषण चंद्रकांत कदम यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी आरे फाटा येथे गुरुदास चौकाच्या रूपाने  उभारले आहे.

चंद्रकांत कदम यांच्या सोबत भजन परंपरा जोपासणारे चिंतामणी पांचाळ, परशुराम पांचाळ, विलास पाटील, वामन खोपकर या भजन सम्राटांच्या आठवणी या उदघाट्न सोहळ्याच्या वेळी जागवल्या जाणार असून त्याना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

या स्मारकाचे उदघाट्न चंद्रकांत कदम यांच्या पत्नी गुरुमाऊली पौर्णिमा कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आरोग्य मंत्री दीपक सावंत, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अड़.अजित गोगटे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

संगीत जुगलबंदी

यावेळी सुप्रसिध्द गायक रुपेंद्र परब, अमित तांबुळकर , तेजस मेस्त्री यांची संगीत जुगलबंदी होणार आहे. त्याना पखवाज साथ मेहल कांडरकर व तबला साथ आबा मेस्त्री करणार आहेत. तसेच स्मारकाचे उदघाट्न झाल्यानंतर चन्द्रकांत कदम (गुरुदास) यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार आहे.

 सुप्रसिध्द गायक विश्वास प्रभु देसाई यांचे गायन होणार असून मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर स्नेह भोजन आणि स्थानिक भजने होतील. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी बुवा, मृदंग मणी तसेच भजन प्रेमिनी उपस्थित रहावे असे आवाहनही प्रकाश पारकर यांनी यावेळी केले.

नवोदित भजनी बुवाना प्रेरणा मिळेल !

आरे फाटा येथील कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांच्यावर असंख्य भजन रसिकांचे प्रेम होते. चंद्रकांत कदम यांच्या स्मृती या स्मारकाच्या रूपाने जपल्या जाणार असून नवोदित भजनी बुवाना त्या माध्यमातून निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही प्रकाश पारकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Kokan Kala Bhushna Chandrakant Kadam memorial commemorates 30th anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.