कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; वाहतूक फोंडाघाटमार्गे, कोकणाकडे जाणारी वाहतुक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:29 PM2018-07-16T15:29:35+5:302018-07-16T15:33:10+5:30
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून पोलिसांनी बंद केली आहे. परिणामी करुळ घाटाची संपुर्ण वाहतूक वैभववाडीतून फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. तर भुईबावडा घाटातील वाहतूक फोंडाघाट व अणुस्कुरा घाटातून वळवली आहे.
प्रकाश काळे
वैभववाडी(सिंधुदुर्ग): तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गगनबावडा कोल्हापूर वाहतूक सकाळी ११ पासून पोलिसांनी बंद केली आहे. परिणामी करुळ घाटाची संपुर्ण वाहतूक वैभववाडीतून फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. तर भुईबावडा घाटातील वाहतूक फोंडाघाट व अणुस्कुरा घाटातून वळवली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरल्यामुळे विसर्ग वाढला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील पुढील काही दिवस वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूकीला फटका बसणार आहे.
कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर आसले-मांडुकली गावी ४ ते ५ फुट पाणी रस्त्यावर आल्यामुळे शिंगणापूर फाटा येथून गगनबावडा मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतुकही बंद करण्यात आली आहे.