कोळकेवाडी कार्यालयाचे स्थलांतर?

By admin | Published: February 13, 2015 10:19 PM2015-02-13T22:19:49+5:302015-02-13T22:55:30+5:30

स्थानिकात खळबळ : शासनाने पाठपुरावा करणारी समिती स्थापन

Kollwadi office shift? | कोळकेवाडी कार्यालयाचे स्थलांतर?

कोळकेवाडी कार्यालयाचे स्थलांतर?

Next

शिरगाव : महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी कोयना नदीची महती सांगत कोयना जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. धर पायथा वीजगृह वगळता पोफळी, कोळकेवाडी येथे ७५ टक्के कामे रत्नागिरी जिल्ह्याातील चिपळूण तालुक्यात सुरु असताना, जलसंपदा खात्याकडून वीजनिर्मिती वगळता इतर शासकीय कार्यालये बिनकामाची ठरवण्यात आली आहेत. या ठिकाणी असलेले कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाच बंद करुन माणगाव जिल्हा रायगड येथे नेण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याच्या वृत्ताने अलोरेत खळबळ उडाली आहे.
१९६७ साली तत्कालीन पाटबंधारे खात्याकडून स्थापत्य, विद्यत व यांत्रिकी विभागाची कार्यालय सुरु झाले. जलविद्युत प्रकल्पासाठी वीजगृह उभारणी, धरण व्यवस्थापन व वसाहत दुरूस्ती व वीज पुरवठा याबरोबरच कोकणचे यांत्रिकी विभागीय अर्थशास्त्र अलोरेत आज सुरु आहेत. कोयना प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प असल्याने आजपर्यंत इथे विविध उपविभाग कार्यरत आहेत.
सद्यस्थितीत येथील मनुष्यबळ अन्यत्र हलवल्यास २५० कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. मुबलक पाणी, वसाहत अंतर्गत रस्ते, पथदीप, बाजारपेठ, शाळा, पोष्ट, बँका या मुलभूत सुविधा असलेले अलोरे गावातील प्रकल्पग्रस्तांचे उद्योगधंदे अडचणीत येऊ शकतात अशी स्थिती आहे. जलसंपदा खात्याचा प्रस्तावित नांदिवसे-स्वयंदेव येथील प्रकल्पाचे काम या विभागाकडून होऊ शकते. पायाभूत सुविधा असलेल्या शासन संपादित जमिनीत शासन अन्य कोणताही उद्योग येथे आणू शकते.
अतिवृष्टीमुळे कुंभार्ली-नवजाघाट बंद असताना, येथे राहणारे मनुष्यबळ महत्वाचे ठरते. अशा अनेक मुद्यांवर वेगाने चर्चा घडू लागल्या आहेत. सिंधुदुर्गातील आरोस नगरीप्रमाणे अलोरेत शासकीय यंत्रणा उभी राहू शकते. या अनुषंगाने स्थानिक मडळींनी चर्चेतून प्रशासकीय स्तरावर या धोरणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची मांडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोळकेवाडी नागावे-अलोरे-पेढांबे, पोफळी-कोंडफणसवणे गावातील शासकीय स्थानिक कर्मचाऱ्यांनाही उतारवयात त्रासदायक ठरणारा शासन निर्णय रद्द व्हावा व इथेच अधिक काम द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पन्नास वर्षानंतर आलेल्या या धक्कादायक बातमीमुळे समांतर समस्या केंद्रस्थानी सर्वपक्षीय क्रीयाशील कार्यकर्ते एकवटले आहेत. प्रकल्प बचाव कृतीसमिती स्थापित करून प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याच्यादृष्टीने एकमताने पेढांबेतील प्रताप शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवत विनो झगडे, रमेश राणे, मयूर खेतले, सुर्यकांत खेतले, घनश्याम पालांडे, प्रकाश मोहिते, चंद्रकांत राणे, रमेश बंगाल यांचा समितीत समावेश आहे. प्राथमिक सभेला ४० स्थानिक मंडळी उपस्थित होती. या सर्व विषयाकडे अधिक गांभिर्याने पहावे लागेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कोळकेवाडी विभाग बंद करून, तो माणगावला जोडल्याचे वृत्त समजताच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Kollwadi office shift?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.