कोकणाला निधी अपुरा पडू देणार नाही
By admin | Published: May 21, 2015 11:56 PM2015-05-21T23:56:22+5:302015-05-22T00:07:48+5:30
सुधीर मुनगंटीवार : गणपतीपुळेत भक्त निवासाचे भक्तार्पण
रत्नागिरी : कोकणला लाभलेला समुद्र किनारा आणि किनाऱ्यालगत असणारी धार्मिक स्थळे पाहता पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला भरपूर वाव आहे. यासाठी सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून कोकणला निधी अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.गणपतीपुळे येथे देवस्थानच्या नूतन भक्तनिवासाच्या भक्तार्पण सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शृंगेरी पीठाचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पंडित वसंतराव गाडगीळ होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आमदार संजय केळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रकाश साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विभागीय वनाधिकारी ए. एन. साबळे, श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे उपस्थित होते.
राज्यातील १७ धार्मिक स्थळे विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. त्यानुसारच कोकणातील विकासाला चालना देणाऱ्या पर्यटनाला ताकद देण्यात येईल.
अत्यल्प दरात राहण्याची सुविधा
आलिशान अशा या भक्त निवासात ७३ खोल्या असून, तेथे राहण्यासाठी २0 रुपयांपासून ३00 रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. येत्या काही दिवसांतच आॅनलाईन बुकिंगची व्यवस्थाही देवस्थानकडून केली जाणार आहे. अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या सुविधेबद्दल सर्वांनीच देवस्थानचे कौतुक केले.