कोकण रेल्वेचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार, नवे वेळापत्रक होणार लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:05 PM2018-10-31T15:05:48+5:302018-10-31T16:02:29+5:30
कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असून, गाड्यांच्या मुंबईला पोहचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
कणकवली :कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असून, गाड्यांच्या मुंबईला पोहचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जून ते ऑक्टोबर या कालावधीत वेळापत्रकात बदल केला होता. दरवर्षी असा बदल करण्यात येत असतो. आता पुन्हा १ नोव्हेंबर पासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग वाढणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांचे नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे
कोकणकन्या अप : सावंतवाडी १९.३६, कुडाळ २०.०९, सिंधुदुर्ग २०.२८, कणकवली २१.०९, वैभववाडी २१.३९, रत्नागिरी २३.००, दादर ०५.१७, सीएसटी ०५.५०.
कोकण कन्या डाऊन : सीएसटी २३.०५, दादर २३.१७, रत्नागिरी ०५.२५, वैभववाडी ०६.५१, कणकवली ०७.२१, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ०७.५४, सावंतवाडी ०८.२२.
तुतारी एक्स्प्रेस अप: सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.३०, कणकवली १९.४६, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, दादर ०६.४५.
तुतारी एक्सप्रेस डाऊन: दादर ००.०५, पनवेल ०१.१५, वैभववाडी ०७.५०, नांदगाव ०५.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४६, कुडाळ ९.००, सावंतवाडी १०.४०.
मांडवी एक्स्प्रेस अपः सावंतवाडी १०.४०, कुडाळ ११.०२, सिंधुदुर्ग ११.१५, कणकवली ११.३३, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.०५, दादर २१.०२, सीएसटी २१.४० .
मांडवी एक्सप्रेस डाऊन : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, रत्नागिरी १३.१५, वैभववाडी १४.४६, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.४०, कुडाळ १५.५४, सावंतवाडी १६.१५.
दिवा पॅसेंजर अपः सावंतवाडी ८.३०, झाराप ०८.४०, कुडाळ ८.५२, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२२, नांदगांव ०९.४२, वैभववाडी ०९.५५.
दिवा पॅसेंजर डाऊन : दिवा ६.२५, वैभववाडी १६.०६, नांदगांव १६.२५, कणकवली १६.४४, सिंधुदुर्ग १७.०२. कुडाळ १७.१५, झाराप १७.३२, सावंतवाडी १७.५०
जनशताब्दी एक्सप्रेस अप: कुडाळ १५.५६., कणकवली १६.२०, रत्नागिरी १७.४५, दादर २३.०५.
जनशताब्दी डाऊन : दादर ५.२५, रत्नागिरी १०.३०, कणकवली ११.५६, कुडाळ १२.२०.
एर्नाकुलम पुणे अप : सावंतवाडी १८.२६, कणकवली १९.१०, पनवेल २२.२०, पुणे ०५.५०.
पुणे एर्नाकुलम डाऊन: पुणे १८.१५, पनवेल २१.२०, कणकवली ०३.१२, सावंतवाडी ०३.५८
तिरूनवेली-दादर अप : कणकवली ०३.४४, रत्नागिरी ०२.२५.
तिरुनवेली डाऊन : कणकवली ०६.२८, रत्नागिरी ०८.०५.
मुंबई-मंगलोर डाऊन : सीएसटी २२.०५, कणकवली ०५.१०.
मुंबई मंगलोर अप : कणकवली २०.४०, सीएसटी ०४.२५.
ओखा एक्सप्रेस डाऊन : २०.३०, अप - कणकवली १३.३८, वसई २३.२०.
मंगला एक्सप्रेस अप : ०५.४२, पनवेल १२.५०, कल्याण १३.४०.
मंगला एक्सप्रेस डाऊन : कल्याण ०८.३२, पनवेल ०९.२५, कणकवली १७.४४.
मत्स्यगंधा एक्सप्रेस अप : कुडाळ २२.१६, ठाणे ०५.५३.
मत्स्यगंधा एक्सप्रेस डाऊन : ठाणे १५.४३, कुडाळ २३.४०.
नेत्रावती अप : ठाणे १६.००, कुडाळ ०६.५०,
नेत्रावती डाऊन: ठाणे १२.०३, कुडाळ २०.१४.
तेजस एक्सप्रेस अप: कुडाळ १५.२८, दादर २२.४०.
तेजस एक्सप्रेस डाऊन : दादर ०५.०८, कुडाळ १२.०४