येत्या पाच वर्षांत कोकणचा कायापालट

By admin | Published: November 16, 2015 09:37 PM2015-11-16T21:37:59+5:302015-11-17T00:02:07+5:30

अनंत गीते : करंजाणी येथील नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी घोषणा

Konkan transformation in the next five years | येत्या पाच वर्षांत कोकणचा कायापालट

येत्या पाच वर्षांत कोकणचा कायापालट

Next

दापोली : येत्या पाच वर्र्षात आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणाच्या आर्थिक विकासाकरिता आवश्यक असणारे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व जलमार्ग यांचे जाळे तयार करणार असून, यानंतर कोकणाचा वेगाने अर्थिक विकास होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केली. तालुक्यातील करंजाणी येथील ग्रामपंचायत कार्यालय व श्री शिवाजी हायस्कूल, करंजाणी नूतन इमारत भूमिपूजन सोहळा अनंत गीते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे उपस्थित होते. कोकणच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत चर्चा झाली असून, आपणाला योग्य जागा उपलब्ध झाली की, तत्काळ या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे दापोलीला वेगळी ओळख निर्माण होईल. विनाअनुदानित शाळांना खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देता येत नव्हता. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना आपण याबाबत विशेष प्रयत्न करून विनाअनुदानित शाळांकरिताही त्यांना अधिक गरज असल्याने खासदार निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. सध्याचे शिक्षण हे रोजगाराभिमुख असावे. ग्रामीण भागात असणाऱ्या कौशल्यांना मान्यता व प्रतिष्ठा मिळायला हवी. याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलेपमेंट मंत्रालय सुरू केले आहे. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून कोकणात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. खेडोपाडी शिक्षणाचे कार्य करणाऱ्या सर्वच शिक्षण संस्थांना आपले नेहमीच सहकार्य होत आले असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्र्रमुख शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, उपसभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी गोलांबडे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, उपसंघटक चंद्रकांत शिगवण, पंचायत समिती सदस्य श्रीपत पवार, रत्नागिरी जिल्हा नियोजन सदस्य विनायक गायकवाड, उपविभागप्रमुख सुभाष कांगणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दापोलीत मेरिटाईम विद्यापीठ होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अवजड व उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी केली. यामुळे दापोलीचे महत्त्व अधिक वाढणार असून, दापोली हे महाराष्ट्रातील परिपूर्ण शिक्षण केंद्र म्हणून भविष्यात ओळखले जाईल.


खेडचा नाच्या पोर : सूर्यकांत दळवी
सूर्यकांत दळवी यांनी आमदार संजय कदम यांच्यावर ‘खेडचा नाच्या पोर’ म्हणून सडकून टीका केली. त्याचा पगार किती व तो बोलतो किती ? त्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आता खालसा झाली असून, युती शासनाची सत्ता आली आहे. तरीही तो भूमिपूजनांचे नारळ फोडत सुटला आहे. आयजीच्या जिवावर बायजी उदार... अशी त्याची गत झाली असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Konkan transformation in the next five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.