गावठाणातून कोकण वगळणार

By Admin | Published: March 20, 2016 12:26 AM2016-03-20T00:26:56+5:302016-03-20T00:26:56+5:30

पंकजा मुंडे : सावंतवाडीत घोषणा; लवकरच प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार

Konkan will be removed from the village | गावठाणातून कोकण वगळणार

गावठाणातून कोकण वगळणार

googlenewsNext

सावंतवाडी : कोकणात मुळात गावठाण ही पद्धतच नाही. तरीही शासन कोकणात गावठाणचा निकष लादून अन्याय करीत आहे, असे येथील लोकांना वाटत असेल, तर आम्ही कोकणातून गावठाणचा निकष वगळू. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणू, अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्या सावंतवाडी येथे कोकण सरस कार्यक्रमस्थळी पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, ‘एसएसआरएलएम’च्या मुख्याधिकारी सुमन रावत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्याधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, आदी उपस्थित होते.
डाटा एन्ट्री आॅपरेटरचा प्रश्न ग्रामविकास विभागाकडे राहिला नसून, तो मुख्यमंत्र्यांकडे आहे. ते त्यातून मार्ग काढतील.
डाटा एन्ट्री आॅपरेटरचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत येत असून, माझ्याकडे हा प्रश्न असता, तर केव्हाच सोडविला असता, असे सांगत डाटा एन्ट्री आॅपरेटरचा चेंडू मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे टोलवला आहे. बचतगटांच्या मालास योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी मॉलमध्ये बचतगटांचा माल ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. नागपूर, औरंगाबाद येथून याची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुंडे यांनी स्पष्ट केले.
कोकणचे पैसे वळविल्याची कबुली
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. येथील राहणीमानही चांगले आहे. स्वच्छतेतही कोकण नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे कोकणातील सोडविण्यासारखे मोठे प्रश्न राहिले नाहीत, अशी कोटी यावेळी मुंडे यांनी केली. कोकणचे जलसंधारणचे पैसे विदर्भ व मराठवाड्याकडे वळविण्यात आले आहेत. कारण तेथील दुष्काळ हा प्रमुख मुद्दा आहे. कोकणात पुरेसा पाऊस आहे. त्यामुळे येथे तत्काळ जलसंधारणची कामे झालीच पाहिजेत, असे काही नाही. मात्र, ज्या जिल्ह्यात गरज आहे, तेथे ती कामे होणे गरजेचे असल्याने आम्ही पैसे वळविले असल्याची कबुली मुंडे यांनी यावेळी दिली.
‘ओबीसी’चे नेते म्हणून छगन भुजबळ थोरच
‘ओबीसी’चे नेते म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आले आहे का, असा सवाल मुंडे यांना केला असता मुंडे म्हणाल्या, ओबीसी नेते म्हणून भुजबळ हे थोरच आहेत; पण त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ती कागदपत्रे मी पाहिली नसून, त्याबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही.

Web Title: Konkan will be removed from the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.