अर्थसंकल्पावर कोकणी ‘मोहोर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 03:46 AM2018-03-11T03:46:50+5:302018-03-11T03:46:50+5:30
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने कोकणातील सर्वच क्षेत्रांसाठी दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन, आरोग्य, रोजगार निर्मिती, ऐतिहासिक वास्तू, खार बंधारे, फलोत्पादनासह सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- महेश सरनाईक
सिंधुदुर्ग - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने कोकणातील सर्वच क्षेत्रांसाठी दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन, आरोग्य, रोजगार निर्मिती, ऐतिहासिक वास्तू, खार बंधारे, फलोत्पादनासह सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची कोकणी ‘मोहोर’ प्रकर्षाने उमटलेली दिसत आहे.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात विशेष तरतूद आहे. इको टुरिझम कार्यक्रमासाठी १२० कोटींची तरतूद आहे.कोकणातील गडकिल्ले, सागर किनारे यांच्या संवर्धनाची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासी जलवाहतुकीसाठीच्या तरतुदीमुळेही कोकणालाच फायदा होणार आहे. समुद्र/खाडीच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात जमिनी नापीक झाल्या आहेत. त्यासाठी नवे खार बंधारे आणि जुन्या खार बंधाºयांची दुरुस्ती यासाठीची ६० कोटींची तरतूदही कोकणासाठी फायदेशीर ठरणार आहे.आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.