कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

By अनंत खं.जाधव | Published: June 5, 2024 05:06 PM2024-06-05T17:06:36+5:302024-06-05T17:07:29+5:30

सावंतवाडी शहरात कमी मताधिक्य मिळाले याबाबतची कारणमीमांसा करणार

Konkani people got their rightful MP ​​says Vishal Parab | कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

सावंतवाडी : कोकणी जनतेला पुन्हा एकदा हक्काचा खासदार मिळाला असून त्यामुळे कोकणाचा विकास झपाट्याने होणार आहे. अनेक कंपन्या येणार असून त्यातून रोजगाराचा प्रश्न सुटेल असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला. ते बुधवारी सावंतवाडीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरात कमी मताधिक्य मिळाले याबाबतची कारणमीमांसा करणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी परब म्हणाले, कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या काळात उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल यावीत आणि येथील युवकांना स्थानिक स्तरावर युवकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही राणेंना गळ घालणार आहोत.अनेक वर्षे रोजगाराबाबत काय होत नाही पण आता भविष्यात असे दिवस राहणार नसून नक्कीच रोजगाराचा प्रश्न सुटेल असेही परब यावेळी म्हणाले.

तसेच राणेंच्या रुपाने पुन्हा एकदा कोकणाला हक्काचा खासदार मिळाला आहे. या ठिकाणी आता कोकणचा विकास झपाट्याने होणार आहे. गेल्या १० वर्षात असलेला विकासाचा “बॅकलॉग” भरुन निघणार आहे. मागील दहा वर्षांत कोकणचा आवाज संसदेत दिसला नाही पण आता कोकणचा आवाज संसदेत दिसेल राणे यांचे कर्तृत्व मोठे आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात येथील जनतेच्या भल्यासाठी मोठ-मोठे उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी आणावेत, अशी गळ त्यांना घालण्यात येणार आहे. यावेळी त्यांंनी राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार्‍या मतदारांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले.

काही ठिकाणी मते कमी-जास्त मिळाली. मात्र यावर चर्चा करणार नाही तर त्या ठिकाणी नेमकी नाराजी काय? याचा शोध घेतला जाणार आहे आणि यापुढे मताचा आकडा वाढावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत, असे ते म्हणाले.राणे यांच्या विजयाचे शिल्पकार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आहेत. सर्वांनी एकत्र काम केल्यामुळे आम्ही हे यश गाठू शकलो, असा दावा त्यांनी केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Konkani people got their rightful MP ​​says Vishal Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.