कोटकामते ग्रामसेवक केतकर यांना ८ हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:28 IST2021-03-30T19:27:16+5:302021-03-30T19:28:31+5:30
Crimenews Devgad Sindhudurg- कोटकामते येथील ग्रामसेवक दीपक चिंटू केतकर यांना ८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले आहे.दीपक चिंटू केतकर हे अनेक दिवस कामासाठी पैसे मागतात असा आरोप होत होता.

कोटकामते ग्रामसेवक केतकर यांना ८ हजाराची लाच घेताना अटक
देवगड:कोटकामते येथील ग्रामसेवक दीपक चिंटू केतकर यांना ८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले आहे.दीपक चिंटू केतकर हे अनेक दिवस कामासाठी पैसे मागतात असा आरोप होत होता.
कोटकामते येथील पंतप्रधान आवास योजनेतील घराचे अनुदान देण्यासाठी तिसरा हप्ता ६० हजार रुपये लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यासाठी ८ हजार रुपये लाच मागितली होती २५ मार्च रोजी लाचलुचपत खात्याने या तक्रारीची पडताळणी केली होती वारंवार विनंती करूनही हे पैसे ग्रामसेवक देत नसल्याने वैतागून लाभार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केली होती हे पैसे देतानाच दीपक चिंटू केतकर यांना आज अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे पोलीस निरीक्षक मितेश केणी नितीन कुंभार पोलीस हवालदार परब रेवडेकर पोतनीस यांनी या कारवाईत भाग घेतला देवगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाचलुचपत प्रतिबंधक खाते अनेक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पकडत आहे सर्वात जास्त प्रकरणे देवगड पंचायत समितीच्या हद्दीत झाली.