लाच स्वीकारल्याप्रकरणी कुडाळ वीज मंडळाचा अभियंता ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 11:10 AM2019-06-02T11:10:05+5:302019-06-02T11:18:37+5:30
ट्रान्सफार्मरमधून वीज पुरवठा चालू करून देण्यासाठी तब्बल 43 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने कुडाळ वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला ताब्यात घेतले आहे.
कुडाळ - ट्रान्सफार्मरमधून वीज पुरवठा चालू करून देण्यासाठी तब्बल 43 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने कुडाळ वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला ताब्यात घेतले आहे.
शनिवारी रात्री ही कारवाई उशिरा करण्यात आली. हरी महादेव कांबळे यांच्याबाबतची तक्रार एमआयडीसी परिसरातील एकाने दिली होती. रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तक्रारदाराची कुडाळ एमआयडीसी मध्ये एक कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी ट्रान्सफार्मर बसवला होता. त्यासाठी डीपी कनेक्शन मिळण्यासाठी कुडाळ कार्यालयात कांबळे याच्याकडे अर्ज दिला होता. मात्र विद्युत पुरवठा चालू करून देण्यासाठी कांबळे यांनी पैशाची मागणी केली.त्यामुळे याबाबतची तक्रार संबंधितांनी लाच लुचपत विभागाकडे केल्यानंतर कांबळे याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले आहे.