कुडाळ पोलीस ठाण्यात १३७ गुन्हे दाखल

By admin | Published: January 3, 2016 12:28 AM2016-01-03T00:28:35+5:302016-01-03T00:28:35+5:30

१३ घरफोड्या : १0 जणांचा मृत्यू तर २४ अपघात

Kudal police station filed 137 cases | कुडाळ पोलीस ठाण्यात १३७ गुन्हे दाखल

कुडाळ पोलीस ठाण्यात १३७ गुन्हे दाखल

Next

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २०१५ सालामध्ये एकूण १३७ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये घरफोडीचे १३ तर अपघातांच्या २४ गुन्ह्यांचा समावेश आहे. या अपघाताच्या गुन्ह्यामध्ये एकूण १० जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षी अल्पवयीन मुले, मुली पळवून नेणे, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार याचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र २०१४ च्या तुलनेत या गुन्ह्याची संख्या ५ ने वाढली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत यंदा एम.पी.डी.ए. अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच कारवाई एक प्रमुख वैशिष्ट्य आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून दिली आहे.
२०१४ मध्ये कुडाळ पोलीस ठाण्यात एकूण १३६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये यंदा एकने वाढ होवून सन २०१५ मध्ये १३७ गुन्हे दाखल झाले. यामध्ये घरफोडीच्या १३ पैकी ८ गुन्हे उघड झाले, फसवणुकीच्या ५ पैकी ४ तर अल्पवयीन मुलांच्या ७ पैकी ७ गुन्हे उघड झाले. त्यापैकी ३ गुन्ह्यात बलात्कार व लैंगिक अत्याचार कायद्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. सरत्या वर्षामध्ये संपत्ती तसेच शरीराविरूद्धचे व बनावट नोटांच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. मोटारसायकल चोरीचे ३ गुन्हे २०१५ मध्ये घडले. वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे चोरीमधील ४ गुन्हेगारांना अटक केली. घरफोडी करून हैराण करणाऱ्या ३ संशयितांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये एकनाथ साळसकर यांनी भूमिका बजावली. याचबरोबर रांगणा तुळसुली येथील ९६ हजारांची चोरी, आदित्य बाजारमधील चोरी यातील आरोपींना अटक केली. शैली गवस हिला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून उघड करण्यात आला. जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. अंतर्गत पहिली कारवाई कुडाळ पोलीस ठाण्यातून केली. याचबरोबर विद्यालयांमध्ये सायबर क्राईम सोशल नेटवर्किंगबाबत कार्यशाळा घेवून जागृती केली. आॅनलाईन पद्धतीने गुन्हे नोंद, तक्रारीची प्रत, खबरीची प्रत व्हॉट्सअप नंबरवर देण्यास प्रारंभ, गुन्ह्याचा तपास कार्यक्षमतेने होण्यासाठी ६ सदस्यांची विशेष समिती असे उपक्रम पोलीस ठाण्यात राबविण्यात आले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Kudal police station filed 137 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.