वाळूशिल्प स्पर्धेत कुणकेश्वरचा संघ अव्वल
By Admin | Published: April 1, 2017 12:11 PM2017-04-01T12:11:50+5:302017-04-01T12:11:50+5:30
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड : पद्मश्री सुदर्शन पटनायक यांची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
मालवण, दि. १ : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या वतीने निर्मल सागर तट अभियानांतर्गत चिवला बीच येथे आयोजित वाळूशिल्प स्पर्धेत कुणकेश्वरच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
निर्मल सागर तट अभियानाअंतर्गत २२ सागरी क्षेत्रातील ग्रामपंचायती मधील एकूण १५ संघातून ६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत द्वितीय महेश आंबेरकर, मनोज चौकेकर, रविराज चिपकर, नितेश कुणकवळेकर (तोंडवळी, चौके, वेंगुर्ला, मालवण), तृतीय - विठ्ठल सारंग, सुधीर पराडकर, अभिषेक पाटील, दुर्वास सावंत, रुपेश मुणगेकर, मंगेश मेस्त्री, सिद्धी मिठबावकर, (आचरा, तोंडवळी, मिठबाव) यांनी क्रमांक प्राप्त केले.
विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणप्रसंगी वाळू शिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनायक, मेरीटाईम बोर्डचे अधिक्षक अभियंता आलोक महाजन, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. अजित टोपनो, बंदर निरीक्षक शेखर वेंगुर्लेकर, सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, विश्राम घाडी, ममता हर्णे, साहेबराव आवळे, कनिष्ठ अभियंता विनायक एकावडे, परेश शिंदे आदी उपस्थित होते.