पशुधनात तब्बल ३४ हजारांनी घट

By admin | Published: May 18, 2015 10:58 PM2015-05-18T22:58:57+5:302015-05-19T00:28:27+5:30

१९ व्या पशुगणनेची आकडेवारी जाहीर : जिल्ह्यात १0 लाख, १३ हजार, ३७९ पशुसंख्या--लोकमत विशेष

Lack of livestock of 34 thousand | पशुधनात तब्बल ३४ हजारांनी घट

पशुधनात तब्बल ३४ हजारांनी घट

Next

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१२ला करण्यात आलेल्या १९व्या पशुगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १० लाख १३ हजार ३७९ एवढी पशुसंख्या असून २००७ ला करण्यात आलेल्या पशुगणनेच्या तुलनेत यावेळी पशुधनात तब्बल ३४ हजाराची घट झाल्याचे पशुविभागामार्फत करण्यात आलेल्या पशुगणनेच्या अहवालावरून समोर आले आहे.
शासन आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुगणना ही दर पाच वर्षांनी केली जाते. १९वी पशुगणना २०१२ मध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पशुगणना करण्यात आली होती. ही पशुगणना २०१२ मध्येच पूर्ण करून ती आकडेवारीचा अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. सर्वच राज्यांचा पशुगणनेचा अहवाल जोपर्यंत केंद्रास सादर होत नाही. तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुगणनेची आकडेवारी प्रसिद्ध न करता त्यात कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. मात्र आता देशातील १९वी पशुगणना पूर्ण झाली असून त्याची आकडेवारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १० लाख १३ हजार ३७९ एवढे पशुधन असल्याचे समोर आले आहे. देशाच्या अर्थरचनेत पशुधनाचा महत्त्वाचा वाटा आहे. अर्थव्यवस्थेत पशुंचा कशाप्रकारे व कसा उपयोग होतो याची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी पशुगणना केली जाते. यामध्ये पशुपासून दुधाचे उत्पन्न किती, मांस किती मिळते, अंडी, लोकराचे उत्पन्न किती मिळते, पशुधनाचा कशाप्रकारे शेतीत उपयोग केला जातो, याची परिपूर्ण माहिती या पशुगणनेद्वारे सरकारला मिळते. या पशुगणनेद्वारे देशात किती पशु-पक्षी आहेत व त्यांच्यात किती प्रजातींचा समावेश आहे, याचीही माहिती मिळते. पशुगणनेच्या आकडेवारीवरून पशुधनासाठी त्यांच्या उपचारासाठी किती लसींचा साठा उपलब्ध करून ठेवावा, तसेच पशुधन विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी व संशोधनासाठी हे मुख्य उद्देश डोळ््यासमोर ठेवून राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.
२००७ रोजी जी पशुगणना करण्यात आली होती त्यात पशुंची संख्या १० लाख ४७ हजार ३९७ एवढी होती. मात्र २०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार ती गणना १० लाख १३ हजार ३७९ एवढी झाली. त्यानुसार तब्बल ३४ हजार ८ एवढी पशुसंख्या कमी झाल्याचे सर्व्हेनुसार समोर आले आहे. पशुधनाच्या संख्येत कमालीची वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विविध योजना राबवत असताना पशुधनात झालेली घट पाहता ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.



पशुधन संख्येत
सिंधुदुर्ग ‘लोयेस्ट’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुधन संख्येत वाढ होण्यास काहीच हरकत नाही. तसे त्याला पोषक वातावरणही आहे. २०१२ची जाहीर झालेली पशुगणनेची आकडेवारी पाहता अहवालातील ३४ जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधन हे खूप कमी आहे. गायी व म्हशींची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात खूप कमी आहे. त्यामुळे पशुधन संख्येत सिंधुदुर्गला लोयेस्टच मानावे लागेल.

म्हशींची संख्या झपाट्याने घटली
सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसाय तेजीत व्हावा यासाठी अनुदान तत्वावर म्हशी विकल्या जात आहेत. असे असले तरी २००७च्या पशुधनाच्या तुलनेत २०१२ मध्ये म्हशींच्या गणनेत तब्बल १४ हजार १२७ ने घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


२००७ व २०१२ची पशुगणनेची तुलना
सन २००७संख्या
पशुची जात
संकरीत व देशी गाय१,७७,३६१
म्हशी८१,०६२
शेळ््या३०,७६१
मेंढ्या०६
डुकरे१,३३८
कोंबड्या७,५६,८६९
एकूण१०,४७,३९७


सन २०१२संख्या
पशुची जात
संकरीत व देशी गाय१,४७,४१०
म्हशी६६,९३५
घोडे१५
गाढव३४
शेळ््या२८,१२५
मेंढ्या११
डुकरे१,६९८
कोंबड्या७,६९,१५१
एकूण१०,१३,३७९

Web Title: Lack of livestock of 34 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.