तलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:52 AM2019-05-04T11:52:38+5:302019-05-04T11:56:03+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने नंतरच्या काळात तुरळक हजेरी लावली . सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवश्यक असा पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील तलाव आणि धरणांच्या पाणी पातळीतही यावर्षी कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीच नदीनाल्यांची पात्रे आटली असून अनेक ठिकाणी यावर्षी उन्हाच्या चटक्यांबरोबरच पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे.

Lakes, ponds, dams, water levels; Status of Sindhudurg | तलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थिती

तलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थिती

Next
ठळक मुद्देतलाव, धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट ; सिंधुदुर्गातील स्थितीउन्हाबरोबरच पाण्याची झळ बसण्याची शक्यता !

सुधीर राणे

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने नंतरच्या काळात तुरळक हजेरी लावली . सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवश्यक असा पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील तलाव आणि धरणांच्या पाणी पातळीतही यावर्षी कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीच नदीनाल्यांची पात्रे आटली असून अनेक ठिकाणी यावर्षी उन्हाच्या चटक्यांबरोबरच पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र झाली आहे.

त्यामुळे यापुढील काळात पाण्याचा वापर अधिक जपून करावा लागणार आहे. ज्या तुलनेत यावर्षी कच्चे आणि पक्के बंधारे होण्याची आवश्यकता होती ते बांधण्याबाबत प्रशासनाकडून म्हणावी तशी तत्परता दिसलेली नाही. त्याचा फटका आता मे महिन्यात बसणार आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास जिल्ह्यातील काही ठिकाणच्या ग्रामस्थाना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात निश्चितच घट झाली आहे. त्यामुळे तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर यापुढील कालावधीत करावा लागणार असल्याची बाब जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्पातील ३१ ऑक्टोबर अखेरच्या अहवालानुसार उपयुक्त पाणीसाठा आणि त्याची टक्केवारी पाहिल्यानंतर समोेर आली आहे. काही ठिकाणची एप्रिल अखेरची आकडेवारी उपलब्ध झाली असून पाणी साठ्यात मोठया प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबर २०१८ अखेर देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ६९.६६८० द.ल.घ.मी उपयुक्त पाणी साठा ( ७१.०८टक्के) होता. गतवर्षी याकालावधीत या धरणामध्ये ८५.०७ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. तर तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५२.०८९० द.ल.घ.मी. पाणी साठा (७८.७०टक्के ) होता. गतवर्षी ऑक्टोबर अखेर ही पाणी साठ्याची टक्केवारी ९४ टक्के होती.

तिलारी जलविद्युत प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०१८ अखेर ८४.१९०० द.ल.घ.मी. पाणी साठा (९८.५७ टक्के ) होता. कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्पामध्येही गतवर्षी आणि यावर्षीची उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के होती . २६एप्रिल २०१९ रोजी ही टक्केवारी ९१. ९६ आहे. म्हणजेच २३.५०८ द.ल.घ.मी पाणी साठा आहे. एप्रिल २०१८ मध्ये हा पाणी साठा २३.७३२ द.ल.घ.मी(९२.८३ टक्के) होता.

शिवडाव लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये २.४९५७ द.ल. घ.मी उपयुक्त पाणी साठा (९४.२५ टक्के) ऑक्टोबर मध्ये होता. या कालावधीत गतवर्षी याच तलावात पाण्याची टक्केवारी १०० टक्के म्हणजे २.६४८० द.ल. घ.मी. पाणीसाठा होता. तर आता एप्रिल २०१९ मध्ये ०.७४७६ द.ल. घ.मी म्हणजे २८.२३टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी एप्रिल मध्ये ०.९४६२ द.ल. घ.मी म्हणजे ३५.७३ टक्के पाणी साठा होता.

नाधवडे धरणात ऑक्टोबर २०१८ मध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९५.८४ टक्के असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ती १०० टक्के होती. एप्रिल २०१९ अखेर ती २.०१५१ द.ल. घ.मी म्हणजे ४६.१३ टक्के पाणी साठा आहे. तर एप्रिल २०१८मध्ये १.९७५० द.ल. घ.मी म्हणजे ४५.२२ टक्के पाणी साठा होता.

ओटव धरणामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ९४.७६ टक्के होती. गतवर्षी या कालावधीत ती १०० टक्के होती. तर एप्रिल २०१९ अखेर १.९७०७ द.ल. घ.मी म्हणजे ४२. ११ टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये २.१८९७ द.ल. घ.मी म्हणजे ४६.७९ टक्के पाणी साठा होता.

देंदोणवाडी प्रकल्पामध्ये एप्रिल २०१९ अखेर ०.१४६६ द.ल. घ.मी म्हणजे १.५० टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये ०.४६७९ द.ल. घ.मी म्हणजे ४.७७ टक्के पाणी साठा होता.

तरंदळे धरणामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९८.९२ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये तो ९९.८२ टक्के होता. एप्रिल २०१९ अखेर २.५३७० द.ल. घ.मी म्हणजे ५५.६६ टक्के पाणी साठा आहे. एप्रिल २०१८मध्ये २.४४९० द.ल. घ.मी म्हणजे ५३.७३ टक्के पाणी साठा होता.

आडेली तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ८९.५२ टक्के तर गतवर्षी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणीसाठा होता. आंबोली तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९७.२२ टक्के पाणी साठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ही टक्केवारी ९९.१९ टक्के होती.

चोरगेवाडी तलावामध्ये ऑक्टोबर २०१८ मध्ये ९७.३१ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणी साठा होता. हातेरी, माडखोल, निळेली या तलावांमध्ये गतवर्षीप्रमाणे ऑक्टोबर मध्ये १०० टक्के पाणीसाठा होता.

ओरोसबुद्रुक तलावात ऑक्टोबर २०१८ मध्ये ६७ .१२ टक्के , सनमटेंब तलावात ९९.१६ टक्के , तळेवाडी डिगस तलावा मध्ये ७४.४०टक्के , दाबाचीवाडी तलावामध्ये ८८.०६ टक्के , पावशी, शिरवल तलावामध्ये ३.०३०० द.ल. घ.मी. म्हणजेच १०० टक्के , कुळास तलावामध्ये ८०.९० टक्के , वाफोली तलावामध्ये ८४.०३ टक्के , कारिवडे तलावात ९६.३९ टक्के , धामापूर तलावात ७३.३७ टक्के , हरकुळ बुद्रुक तलावात ९५.६३ टक्के , ओसरगाव तलावात ६३.७८ टक्के , ओझरम तलावात ८९.४८ टक्के , पोईप तलावात २५.१९ टक्के , शिरगाव तलावात ६७.३२ टक्के , तिथवली तलावात ९४.३७ टक्के , लोरे तलावात ९४.९० टक्के पाणीसाठा होता. आता एप्रिल महिन्यात या पाणी साठ्यात मोठया प्रमाणात कपात झाली आहे.

त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील तलाव आणि धरणातील पाणीसाठ्याची ही सद्यस्थिती पाहता शेती आणि पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे चोख नियोजन आता तरी करावे लागणार आहे. अजून संपूर्ण मे महिना शिल्लक असून जून महिन्यात वेळेवर जर पाऊस पडला नाही तर सध्याच्या उष्णतेचे प्रमाण पाहता पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी ठोस नोयोजन करणे आवश्यक आहे. तर जनतेने सामाजिक भान राखत पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहे.

Web Title: Lakes, ponds, dams, water levels; Status of Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.